चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या शालेय शासकीय स्कॉलरशिप परीक्षेच्या यशाची परंपरा कायम

चिंचवड, (महाराष्ट्र बरेको न्यूज) – नुकताच शासकीय स्कॉलरशिप परीक्षा इ 5 वी व 8 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांनी उत्तम या संपादन करून मेरिटमध्ये स्थान प्राप्त केल्या बद्दल त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यशस्वी विदयार्थी
1) कु जाधव उत्कर्षा–इ 5 वी.. 226
2) चि.हर्ष ढोकले… इ 5 वी..220
3) चि.भोम्बे आर्यन.. इ 8 वी..240
4) चि. जाधव इशान.. 8 वी..208
5) चि पुजारी हर्षवर्धन..8 वी..232
6) कु पवार श्रेया.. 8 वी..214
संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव सचिव संजय जाधव संचालक मा विजय जाधव सर यांनी देखील विद्यार्थ्यांनचे कौतुक केले व पुढील परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्या मृदुल सैनी व कु अनन्या सैनी , विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उप मुख्याध्यापिका सुषमा संधान,कमिटी मेंबर छाया ओव्हाळ, मनीषा जाधव आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव तर क्रीडा शिक्षक शब्बीर मोमीन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.













