राजर्षी शाहू महाराज विद्यालयात बालदिन साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये आज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोकुळजी गायकवाड साहेब व संस्थेचे सचिव एल.एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित नेहरू जयंती (बालदिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून सृजन अकॅडमीचे संस्थापक संतोष नांदे उपस्थित होते.
सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय छान शब्दात आपले मनोगत व्यक्त करताना पंडित नेहरूंच्या राजकीय व सामाजिक जडण घडण व कारकीर्द यावर प्रकाश टाकला. प्रमिथ फाउंडेशनचे मा. थोरात सर यांनी पंडित नेहरू यांचेविषयी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. संतोष नांदे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पंडित नेहरू यांच्या विचारांचा दाखला दिला. प्रमिथ फाउंडेशन च्या वतीने भाषणामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना छोटेखानी बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घरडे, सुजाता जोगदंड, सुभाष कावळे प्रमोद डोंगरदिवे उमेश मानेपुनम तारख, संदीप बोर्गे, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, जयश्री महानवर, प्रमोद रायकर, अमोल सूर्यवंशी, धुडकू कुवर, स्वप्निल पठारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बडे व आभार योगिता होनमाने यांनी मानले. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




















