ताज्या घडामोडीपिंपरी

चिखली पोलिसांची दखलपात्र कामगिरी: मंदिरातील चोरी उघड, वस्तू परत मिळाल्या”

Spread the love

चिखली, (महाराष्ट्र) – टाळगाव चिखली येथील प्रसिद्ध व जुने श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर, हे गावाचे ग्रामदैवत असून श्रद्धेचे केंद्र मानले जाते. काही दिवसांपूर्वी या मंदिरात चोरीची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, चिखली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम पथकाने जलद गतीने तपास करत ही चोरी उकलण्यात यश मिळवले असून चोरी गेलेले दागिने व इतर मौल्यवान वस्तू पुन्हा मंदिराच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही परतफेड पोलीस निरीक्षक  राजेश मासाळ यांच्या हस्ते मंदिर समितीकडे करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य किशोर बालघरे, बाळासाहेब मोरे, सिताराम मोरे, प्रकाश चौधरी तसेच स्थानिक नगरसेवक मा. दिनेश यादव उपस्थित होते.

चिखली पोलीस स्टेशनच्या या कार्यवाहीमुळे ग्रामस्थांतून समाधानाची भावना व्यक्त होत असून, पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंदिराचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता, पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कर्तव्यदक्षता ही स्तुत्य आहे.

श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, परिसरातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथील विविध धार्मिक उत्सव, यात्रा व मोठ्या प्रमाणावर होणारी भाविकांची गर्दी ही या देवस्थानाचे महत्त्व अधोरेखित करते. त्यामुळे अशी चोरीची घटना अत्यंत गंभीर मानली जात होती.

पोलीस विभागाच्या या यशस्वी कार्यवाहीमुळे न्याय मिळाला असून गावकऱ्यांनी व भाविकांनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button