ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी
चिखलीत जितेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भगिनींसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम
कार्यक्रमाचे खास आकर्षण सोन्याची नथ, मानाची पैठणी, इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि लहान मुलांसाठी सायकलींचा लकी ड्रॉ

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १ मधील महिला भगिनींसाठी जितेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा आणि आनंददायी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम चिखली येथील म्हेत्रे गार्डन येथे मंगळवारी 4 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजिका शीतल यादव यांनी दिली.
महिलांसाठी मनोरंजन, स्पर्धा आणि भरपूर सरप्राईझ गिफ्ट्स अशा या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यात अकरा भाग्यवंत भगिनींना सोन्याची नथ आणि मानाची पैठणी भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपस्थित माता-भगिनींसाठी प्रत्येकासाठी आकर्षक भेटवस्तूंची सोय देखील करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षीच्या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉद्वारे एक भाग्यवंत महिलेला इलेक्ट्रिक टू व्हीलर भेट मिळणार आहे. तसेच लहान मुलांसाठीही लकी ड्रॉमधून दोन सायकली देण्यात येणार असून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजिका शितल जितेंद्र यादव यांनी केले असून त्यांनी सांगितले, “हा कार्यक्रम हा फक्त मनोरंजनासाठी नसून महिलांच्या आनंद, सन्मान आणि एकत्रतेचा उत्सव आहे. प्रत्येक माता-भगिनीला आनंदाचा हा क्षण अनुभवावा हीच आमची इच्छा आहे.”
कार्यक्रमाला परिसरातील महिला, नागरिक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभण्याची शक्यता असून चिखली परिसरात या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




















