ताज्या घडामोडीपिंपरी

“प्रश्न मांडणारे नाही, प्रश्न सोडवणारे नेतृत्व!” – पुनावळे–ताथवडेत चेतन अण्णा पवारांचा प्रचाराचा धडाका

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुनावळे–ताथवडे परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यावर सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून मा. चेतन अण्णा पवार यांचे नाव पुढे येत आहे. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर वर्षभर जनतेशी नाळ जपून काम करणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख परिसरात दृढ होताना दिसत आहे.

सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणे, प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधणे, हा त्यांचा काम करण्याचा पद्धतशीर दृष्टिकोन आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, शाळा, दफनभूमी, धार्मिक स्थळे तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहत, दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या विषयांवर ठोस उपाययोजना राबवण्यावर त्यांचा विशेष भर आहे. पुनावळे अंडरपास, ताथवडे अंडरपास, खराब रस्त्यांची दुरुस्ती, डी.पी. प्लॅनमधील आरक्षणांची अंमलबजावणी, हॉस्पिटल सुविधा आणि सुसज्ज ड्रेनेज व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांसाठी ते सक्रियपणे पाठपुरावा करत आहेत.

परिसराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी पुढील काळात अधिक मोठ्या ताकदीने आणि ठोस भूमिकेतून काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी नागरिकांमध्ये निर्माण केला आहे. त्यामुळे “काम बोलते” या भूमिकेमुळे मा. चेतन अण्णा पवार यांना पुनावळे–ताथवडे परिसरात वाढता जनसमर्थन मिळत असून, ते एक विश्वासार्ह व जनतेच्या प्रश्नांशी एकनिष्ठ राहणारे नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button