उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार,जेष्ठ नेते तथा आमचे मार्गदर्शक चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आपुलकीचा संवाद साधत शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, त्यांच्या या भेटीवेळी दादांनी भक्तिभावाने बाप्पांची आरती करून आशीर्वाद घेतले.
याच प्रसंगी नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटन बळकट करणे, जनसंपर्क वाढवणे आणि भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व दादांनी अधोरेखित केले.नवनिर्वाचित सदस्यांना त्यांनी आगामी काळात संघटनेची जबाबदारी अधिक जोमाने पार पाडण्याचे आवाहन केले.
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करून शहरातील विविध उपक्रमांची माहिती दिली.श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी खासदार अमर साबळे,आमदार अमितजी गोरखे,आमदार उमा खापरे,मा.महापौर उषा उर्फ माई ढोरे,श्री उमेश चांदगुडे,मा. अध्यक्ष पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण श्री.सदाशिवजी खाडे,संघटन सरचिटणीस श्री.मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस श्री. विकास डोळस, सरचिटणीस सौ.वैशालीताई खाडये, सरचिटणीस श्री. मधुकरभाऊ बच्चे, राज्यपरिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री काळुरामभाऊ बारणे, उपाध्यक्ष श्री.विनायकदादा गायकवाड, उपाध्यक्ष श्री.रामभाऊ वाकडकर, उपाध्यक्ष श्री.अमितभाऊ पसरणिकर, उपाध्यक्ष श्री विनोदशेठ मालू, प्रदेश दक्षिण भारतीय आघाडी माजी अध्यक्ष श्री राजेशअण्णा पिल्ले, प्रवक्ता श्री. कुणालभाऊ लांडगे, श्री शीतलजी शिंदे,श्री राजूभाऊ दुर्गे,आमचे प्रेरणास्थान श्री नारायण आबा काटे,आमचे मार्गदर्शक श्री जयनाथशेठ काटे,सदस्य धनूभाऊ ढोरे, मंडल अध्यक्ष श्री सोमनाथ तापकीर,श्री मोहनभाऊ राऊत,श्री हर्षदभाऊ नढे,मंडल अध्यक्षा सौ.अनिताताई वाळुंजकर,श्री गणेशभाऊ वाळुंजकर,संत तुकारामनगर- खराळवाडी- कासारवाडी मंडल अध्यक्ष श्री मंगेश धाडगे,सचिव श्री खंडूशेठ कठारे, सचिव श्री मंगेश कुलकर्णी,सचिव श्री गिरीश देशमुख,सचिव श्री अभिजित बोरसे,कोषाध्यक्ष श्री राजाभाऊ मासूळकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सुजाताताई पालांडे,मा. नगरसेवक श्री चंद्रकांत अण्णा नखाते,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री दिनेशभाऊ यादव,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री बापूसाहेब घोलप,OBC मोर्चा अध्यक्ष श्री चेतनभाऊ भुजबळ, सहकार आघाडी श्री सुनीलशेठ कुंजीर, दिव्यांग सेल श्री अंकुश शिर्के, सांस्कृतिक सेल अध्यक्ष श्री विजयशेठ भिसे,OBC मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री मनोज ब्राह्मणकर, श्री केशवभाऊ घोळवे,श्री. अजितभाऊ कुलथे, श्री.कैलासभाऊ सानप,सीए सेल अध्यक्ष श्री बबन डांगले, वैद्यकीय प्रकोष्ट डॉ. अमितजी नेमाने,मा.युवा मोर्चा अध्यक्ष श्री राज तापकीर, आयुष्यमान भारत सेल श्री गोपाळ माळेकर,श्री कैलास सानप,श्री नानिक पंजाबी,श्री गणेश ढाकणे, प्रदीप बेंद्रे, राजाभाऊ चिंचवडे, प्रसिद्ध गाडामालक भानुदासशेठ काटे पाटील, पोपटतात्या काटे, उद्योजक वसंतशेठ काटे, उद्योजक सोमनाथ काटे उद्योजक राहुल काटे, रमेश काटे, संजय भिसे, कुंदा भिसे, प्रकाशभाऊ झिंजुर्डे, श्री.बाळासाहेब काटे, अर्जुन काटे, भरत काटे, चंद्रकांत काटे, संदीप काटे, आबा पांढरे, अरुण चाबुकस्वार, सुदाममामा कापसे, सुभाषशेठ भिसे, कैलास कुंजीर, श्री.प्रवीण कुंजीर,श्री प्रमोद नढे,श्री अमोल नखाते,भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.














