‘चॅम्पियन अरेना शूटिंग अकॅडमी’च्या नेमबाजांचा ‘प्रे नॅशनल स्पर्धेत’ दमदार विजय; राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथील चॅम्पियन अरेना शूटिंग अकॅडमी (Walke Federation) च्या नेमबाजांनी अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या G.V. Mhalgunker ‘Pre National Shooting Competition’ मध्ये घवघवीत यश मिळवत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्व नेमबाजांनी आगामी ‘National Shooting Competition’ साठी पात्रता मिळवली आहे.
अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक ओम पोखरकर सर (आंतरराष्ट्रीय दर्जाचे 10 व 25 मीटर शूटिंग कोच) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट प्रगती साधली.
🎯 उत्कृष्ट कामगिरी करणारे नेमबाज :
स्वर संगम कुमावत – ३५९/४००
सोहम बाबासाहेब गंजे – ३५७/४००
समर्थ शेलार – ३५२/४००
हर्षवर्धन टिकायत – ३४४/४००
प्रियांका भास्कर गार्जे – ३३५/४००
तसेच विवान तानपुरे, सतीश वाघ, स्वरूप शेलार आणि वद्श्री यांनीही आपल्या गटात सर्वोत्तम गुण मिळवत उत्कृष्ट नेमबाजी सादर केली.
प्रशिक्षक पोखरकर सर म्हणाले, “खेळाडूंनी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवले आहे. आता राष्ट्रीय स्तरावर आणखी मोठे यश मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
या उल्लेखनीय यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल झाले असून, पालक व क्रीडाप्रेमींनी सर्व नेमबाजांचे अभिनंदन केले आहे. चॅम्पियन अरेना शूटिंग अकॅडमीने अत्याधुनिक सुविधा, अनुभवी मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीमुळे राज्यातील अग्रगण्य शूटिंग प्रशिक्षण केंद्र म्हणून लौकिक मिळवला आहे.




















