रक्षाबंधनाचे औचित्य साधून चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये विशेष उपक्रम

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षाबंधनाच्या निमित्ताने चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी डॉक्टर, अत्यावश्यक सेवा कर्मचारी तसेच बस ड्रायव्हर यांच्यासोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधून भावाने तिचे रक्षण करण्याची ग्वाही देण्याची ही परंपरा विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरी केली. मुलींनी रक्षाबंधना साठी राख्या ह्या स्वतःहा बनवलेल्या होत्या.
या कार्यक्रमाला शाळेचे संचालक संदीप काटे यांनी मार्गदर्शन करत रक्षाबंधनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भाष्य केले. आणि आज आपल्या मुलींनी डॉक्टर, अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि बस ड्रायव्हर यांच्यासोबत राखी बांधून समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करण्याचा आदर्श घालून दिला आहे.
राखी ही फक्त दोरा नाही, तर ती विश्वास, प्रेम आणि जपणुकीचं प्रतीक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्यावी, त्यांचं रक्षण करावं, हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे. समाजात प्रेम, ऐक्य आणि बंधुभाव टिकवून ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे.”
तसेच शाळेच्या उपसंचालिका अनिता काटे आपल्या मुलांमध्ये बंधुत्व, परस्पर आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे. आजच्या काळात रक्ताचे नाते असो वा नसो, एकमेकांसाठी उभे राहणे, संकटात साथ देणे आणि परस्परांचा सन्मान राखणे हीच खरी रक्षाबंधनाची शिकवण आहे.
बस ड्रायव्हर प्रशांत गोसावी यांनीही आपल्या भावना व्यक्त करून विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून मानवी नात्यांतील प्रेम, आपुलकी आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.








