पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. शाळेचे मुख्याध्यापक सौ सुविधा महाले शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावली. “एक विद्यार्थी – एक झाड” या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक संदीप काटे सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावले. त्याच बरोबर
“स्वच्छ, हरित आणि सुरक्षित पर्यावरणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे,” असे शाळेच्या उपसंचालिका अनिता काटे म्हणाल्या.तसेच विध्यार्थ्यांना पर्यावरण पूरक सवयी अंगीकरणाचे आवहान केले.
