ताज्या घडामोडीपिंपरी

चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात, देशभक्तीच्या वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून साजरा करण्यात आला.

शाळेच्या प्रांगणात सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, नृत्य आणि लघुनाटिकांनी सर्वांचे मन भारावून टाकले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुजित डोंगरजाल यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील वीरश्रीपूर्ण बलिदानांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हेच उद्याचे देशाचे नेते आहेत. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेम या मूल्यांचा अंगीकार करून देश प्रगतीपथावर नेणे ही आपली जबाबदारी आहे.”

शाळेचे संचालक संदीप काटे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच चारित्र्य घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “पुस्तकी शिक्षणाबरोबरच संस्कार आणि अनुशासन हेच खऱ्या शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याचा संकल्प केला पाहिजे.”

शाळेच्या उपसंचालिका सौ. अनिता काटे यांनी आपल्या भाषणातून एकतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “धर्म, जात, भाषा यापलीकडे जाऊन आपण सर्वांनी ‘भारतीय’ म्हणून एकत्र राहणे गरजेचे आहे. देशाची प्रगती ही आपल्या सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून आहे.”

शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले यांनी विद्यार्थ्यांना अनुशासन, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले की, “विद्यार्थीदशेतच आपण आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश तुमच्याच पावलांशी राहील. देशासाठी योगदान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

या कार्यक्रमाला विशेष मान्यवर म्हणून श्री. अमित काटे, योगेश भंडारकर, सतीश फुलारी, कृष्णराज कलघटगी, देवदत्त उधोवजी आणि स्मिता दळवी यांची उपस्थिती लाभली. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणां दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button