अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड च्या वतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आपण यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातील संस्कृती संवर्धन विकास महामंडळ अंतर्गत मुठभर शेंगदाणे वारकऱ्यांसाठी उपक्रमात सहभाग घेतला. यासाठी महासंघातील पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले.
दरवर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा दरवर्षी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतो. आत्तापर्यंत महासंघाने पर्यावरण पूरक कापडी पिशव्या पाण्याच्या बाटल्या त्याचप्रमाणे साबण अशा नित्य उपयोगी गोष्टींचे वाटप केले आहे.
ह्यावर्षी देखील मुठभर शेंगदाणे वारकऱ्यांसाठी या उपक्रमांतर्गत महासंघाने सुमारे ६५ किलो शेंगदाणे वारकऱ्यांसाठी दिले. हे शेंगदाणे संस्कृती सेवा महामंडळाचे श डॉक्टर अजित जगताप यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी सुपूर्त केले.
या प्रसंगी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, राजन बुडूख, दिलीप कुलकर्णी, प्रदेश चिटणीस संजयजी परळीकर, महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिला अध्यक्ष सुषमा वैद्य, सरचिटणीस आनंद देशमुख, भाऊ कुलकर्णी, भूषण जोशी अभय कुलकर्णी, श्रीकांत वैद्य, अनुजा पोटे, संध्या कुलकर्णी व आरती खोसे इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दिलीप कुलकर्णी यांनी महासंघ वारकऱ्यांसाठी तसेच इतर विविध सामाजिक उपक्रम जे दरवर्षी राबवत असतो अशा उपक्रमाची माहिती दिली.










