“मी गड बोलतोय” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभूव्याख्याते बालाजी काशिद यांच्या “मी गड बोलतोय” या ऐतिहासिक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे.( ज्येष्ठ इतिहास संशोधक), आनंद पिंपळकर (प्रसिद्ध वास्तूशस्त्र तज्ञ), डॉ. लवनीश त्यागी (प्रमुख संचेती हॉस्पिटल पुणे), संजय पासलकर(अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे ), मारुती गोळे(दुर्ग अभ्यासक), सुनील रासने(अध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ). महेश सूर्यवंशी (खजिनदार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट), अक्षय आबनावे(अध्यक्ष शिवशंभू प्रतिष्ठान हडपसर पुणे),श्री अनिल (बापू) जेधे( अध्यक्ष शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे) अनेक मान्यवर उपस्थित होते..यावेळी मी गड बोलतोय या पुस्तकाची थोडक्यात प्रस्तावना लेखक बालाजी काशीद यांनी सांगितली.. गडदुर्ग घडवायला आणि त्यांचे संरक्षण करायला अनेक मावळ्यांनी रक्ताचा अभिषेक या मातीत केला… कित्येक हजारो आयाबहिणीचे कुंकू या गडकोटांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी या मातीसाठी पुसले गेल याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे अशी भावना लेखकाने व्यक्त केली. तसेच आनंद पिंपळकर यांनी देखील सांगितले की देव देश धर्म टिकवायचे असेल तर आपली इतिहासाची संस्कृती जपून ठेवली पाहिजे हे गडदुर्ग जपले पाहिजे त्यांचे वैभव टिकून ठेवणं हे प्रत्येकाचे काम आहे.. असं मत व्यक्त केलं त्याबरोबरच सुनील काका रासने ,कर्नल डॉक्टर लवनीश त्यागी, मारुती (आबा) गोळे, संजय दत्तात्रय पासलकर, अक्षय आबनावे , यांनी देखील गडदुर्ग बद्दल अतिशय उत्तम प्रकारे उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.पांडुरंग बलकवडे यांनी इतिहासातील काही महत्त्वाच्या गोष्टी गडदुर्गण बाबतीत असणारे महत्त्व तरुणाईला पटवून दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कुंदे व ॲड.संदेश साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल (बापू)जेधे यांनी केले.








