प्रत्येकाने महापुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -:बहुजनांच्या उद्धारासाठी व समाजातील विषमता नष्ट करून समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले असे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचा 9 वा नामकरण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी वरील प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचच्या अध्यक्षस्थानी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोकुळजी गायकवाड साहेब होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सन्माननीय सचिव एल.एस. कांबळे सर, तसेच बेद मुत्था ( शालेय पोषण आहार वितरक), प्रशांत शर्मा ( प्रबंधक – CSR Fund, CIE India Ltd.), योगेश बाविस्कर ( प्रेसिडेंट – CIE), योगेश गोरडे ( National head – Operation), पोपट आरणे ( शिक्षक पालक संघ – उपाध्यक्ष), लहू गायकवाड किशोर मराठे ( मुख्य प्रशिक्षक), मेघा चव्हाण ( सहाय्यक प्रशिक्षक), बाबाजी शिंदे. ( मुख्याध्यापक) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय विठ्ठल साळुंखे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिलेच शिवाय विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी म्हणूनच वावरले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. छ. शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपली पावले वाचनालयाकडे, व्यायामशाळेकडे व प्रार्थनालयाकडे वळवल्यास त्यांचे भविष्य नक्कीच उज्वल असेल असे मत व्यक्त केले. यावेळी प्रशांत शर्मा साहेब यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव एल.एस. कांबळे सर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गोकुळजी गायकवाड साहेब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजर्षी शाहू महाराज यांचे समाजासाठी असलेले योगदान विशद केले. CIE या संस्थेच्या वतीने प्रमिथ फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यालयातील 779 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे (शाळेची बॅग, कंपास, नोट बुक,) वाटप करण्यात आले. बेद मुत्था साहेब यांनी विद्यालयासाठी 111111/–( एक लाख 11 हजार 111) रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घरडे, सुजाता जोगदंड, सुभाष कावळे, संदीप बोर्गे, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, उमेश माने, पुनम तारख, किशोर बडे, संगीता शिंदे, मोहिनी चव्हाण, आनंद गोंदिल, योगिता होनमाने, जयश्री महानवर, प्रमोद रायकर, अमोल सूर्यवंशी, धुडकू कुवर, स्वप्नील पठारे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद डोंगरदिवे यांनी केले व आभार पूनम तारख यांनी मानले.खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले












