मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर कुदळवाडीत उत्साहात संपन्न

कुदळवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यादवनगर, कुदळवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
“एक थेंब रक्ताचा, वाचवेल जीव मोलाचा!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सुरू झालेल्या या शिबिरात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अनेक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिराचे प्रमुख आयोजन मा. आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर मुख्य समन्वयक अँड योगेश सोनवणे श्री दिनेश लालचंद यादव यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट / ब्लूटूथ / टिफिन बॉक्स यापैकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, त्यामुळे युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
यावेळीआमदार श्री पै महेश लांडगे,योगेश लांडगे, माजी नगरसेवक कुदंन गायकवाड, संतोष मोरे, योगिता नागरगोजे, निलेश नेवाळे, किसन बावकर, उत्तम बालघरे
अजय पाताडे, संतोष ठाकुर, कविता हिंगे, गोरख पाटील, अजय साने, संदीप शेलार, राजेश डोगंरे, कपिल म्हेत्रे,विशाल डोगंरे, अरुण पाडुळे, सुधाकर धुरी,सागर बालघरे, नितीन साळी, रामकृष्ण लांडगे, विशाल बालघरे, नितीन मोरे, दत्तात्रय मोरे, किशोर बालघरे, विजयराज यादव, बाळासाहेब मोरे, दिलीप यादव, साहेबराव यादव, लालचंद यादव, संभाजी बालघरे, गणेश भुजबळ, रामराजे भोसले,काका शेळके, सुरेश वाळुंज, स्वप्निल डावखरे, दिपक घन, प्रकाश बालघरे, विकास यादव, अमित बालघरे, मिलिंद पवार,सोमनाथ यादव, गणेश यादव, योगेश यादव, निलेश यादव, निशा यादव, अजिता यादव, गौरी यादव मोनिका गाढवे, शंकर घंगाळे,रोहित कदम,पोपट यादव अंकुश गोडंवळ,कुंदन गुप्ता,आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दान असं जे हृदयातून येतं — तेच असतं रक्तदान!” या भावनेने प्रेरित होत पार पडलेले हे शिबीर सामाजिक जाणीवेचे उत्तम उदाहरण ठरले.













