शाम जगताप व तृप्ती तानाजी जवळकर यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाम जगताप व तृप्ती तानाजी जवळकर मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उदघाट्न महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, तृप्ती जवळकर यांनी रक्तदात्यांचे स्वागत केले.
संस्कृती लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा दरम्यान माजी नगरसेवक अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, चंदा लोखंडे, शीतल शितोळे, उज्वला ढोरे, सुनीता कोळप, शोभा पगारे, विष्णू शेळके, बाळासाहेब पिल्लेवार, पवन साळुंके, सतीश चोरमले, बाळासाहेब सोनवणे, उदय ववले, ओंकार भागवत, अशोक जगताप, बाळासाहेब काटे, अतुल काशिद, गणेश काशिद, नितीन काशिद, अभय नरवडेकर, शशिकांत देशपांडे, प्रमोद शिंदे, संदीप नलावडे, दत्ता कदम, निखिल जगताप, हिमांशू जगताप, सौरभ जगताप, अक्षय जगताप, गणेश गिरमकर, अमोल झांबरे, कुंदन गोसावी, दिग्विजय जगताप, संकेत विधाते, गणेश फुगे, दिनेश कोतवाल, अभिजीत काशिद, अथर्व जगताप, शुभम विधाते, धर्मा चोथवे, प्रवीण चव्हाण, प्रतुल साखरे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांची भेट घेतली.













