वृत्तपत्र विक्रेत्यांनी रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या कृष्णा नगर चौकातील वृत्तपत्र विक्रेते मिलिंद दाभोळकर यांनी वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत बुधवारी दिनांक (3 )25 वे रक्तदान केले आहे. या माध्यमातून त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक भान जपले.
दाभोळकर यांनी 1998 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे पहिल्यांदा रक्तदान करून अपघातग्रस्त महिलेला जीवदान मिळवून दिले होते.त्यानंतर वेळोवेळी गरजू रुग्णांना रक्तदान केले.
बुधवारी वाय सी एम रुग्णालयातील व्यक्तीकडे रक्तदान केले डॉक्टर नीता पाडगे डॉक्टर गणेश लांडे डॉक्टर जयंत जाधव परिचारिका चव्हाण,पोपट आ रणे,आम्रपाली गायकवाड सुनील आवटे आदी उपस्थित होते. वाढदिवसाच्यानिमित्त तरी जीव वाचावा या येथून रक्तदान केल्याचे दाभोळकर यांनी सांगितले.
त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकाकडून कौतुक होत आहे. रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी असा संदेश देऊन त्यांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे.














