ताज्या घडामोडीपिंपरी

स्व प्रा. प्रकाश पगारिया यांच्या 41 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित 41 व्या रक्तदान शिबिरात 53 जणांचे रक्तदान

Spread the love
कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी  येथील पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व.प्रा. प्रकाश पगारिया यांच्या 41 व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन आधार ब्लड बँकेचे जनसंपर्क प्रमुख मकरंद शापुरकर यांच्या सहकार्याने आयोजित केले गेले.मंडळाच्या या  41 व्या रक्तदान शिबिरामध्ये आज दिनांक एक डिसेंबर रोजी 53 जणांनी रक्तदान केले. पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने गेली 41 वर्षे सातत्याने ह्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.मंडळाकडे सुमारे 3500रक्तदात्यांची सुची असून अनेक गरजुंना मोफत रक्त दिले जाते. रक्तदान शिबीराच्या आयोजनासाठी युवक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते श्रेयस पगारिया, पंकज कांकरिया , श्रेणिक मंडलेचा, राहुल, कल्पेश,मयुर ,विपुल  पगारिया , प्रशांत बाफना, रोहन बोरा  आदिंनी परिश्रम घेतले.
यासाठी जैन कॉन्फरन्स चे जैन भवन योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष विलास कुमार पगारिया, शांताराम जाधव, पार्श्वनाथ सोसायटी चे अध्यक्ष
 अनिलकुमार कटारिया , शांताराम जाधव, वसंतलाल बोरा , रमणलाल कर्नावट आदी ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. माजी नगरसेवक शाम लांडे, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त लांडे , रोटरी क्लब भोसरीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे , जयहिंद दौंडकर सुरेश गदिया आदिंनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button