ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो युवा रन’चे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर) या कालावधीत भाजपातर्फे सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे २१ सप्टेंबर रोजी ‘नमो युवा रन’ नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने भाजयुमोचे प्रदेश सचिव व नमो युवा रन या अभियानाचे पिंपरी चिंचवड शहराचे सहसंयोजक अजित कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष दिनेश यादव, संकेत चोंधे, प्रदेश सरचिटणीस-भटके विमुक्त आघाडी प्रमोद परदेशी, राहुल खाडे, देवयानी भिंगारकर, सुधीर साळुंखे व भाजपा युवा मोर्चातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













