शहर भाजपचे युवा नेतृत्व सोमनाथ मोहन तापकीर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपचे युवा नेतृत्व सोमनाथ मोहन तापकीर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला.
आरंभ लॉन्स, काळेवाडी येथे इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळ्यात हजारो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
या सोहळ्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात प्रथम बक्षीस म्हणून १२८ जीबी टॅब देण्यात आला. तसेच पाच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय बॅग, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास उपस्थित मान्यवरांमध्ये भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, वरिष्ठ सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष कैलास सानप, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे, माजी स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, विनोद तापकीर, बेटी बचाव बेटी पढावच्या अध्यक्षा सीमा चव्हाण, महिला उद्योग आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णा सोनवलकर, माजी नगरसेविका पाडाळे, सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे, दिनेश नढे, सचिन काळे, शहाजी आतार, राजेंद्र पवार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन अनिल गुंजाळ (सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग) यांनी केले. तर आभार प्रदर्शन अशोक शेळके यांनी केले.
आर्थिक मदत मिळालेले विद्यार्थी : श्रावणी सूर्यवंशी – नढेनगर नंदिनी सिंग – ज्योतिबा नगर तहसील जमादार – स्वामी समर्थ कॉलेज करण जाधव – मोरया कॉलेज निखिल फडतरे – तापकीर मळा चौक.
या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “या मदतीमुळे आमच्या शिक्षणाला मोठा हातभार लागला असून सोमनाथ दादांचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत.”
कार्यक्रमानंतर सोमनाथ मोहन तापकीर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून, अशा समाजोपयोगी कार्यक्रमांची परंपरा पुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.















