पिंपरी-चिंचवड भाजप स्वातंत्र्यदिन ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा करणार; शहरातून 1 लाख 45 हजार राख्या पाठवणार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा स्वातंत्र्यदिन केवळ एक राष्ट्रीय सण म्हणून नव्हे, तर भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचा ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत आगामी कार्यक्रमांची सविस्तर आखणी करण्यात आली.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्णपणे यशस्वी झाले आहे. दहशतवादी शक्तींना धडा शिकवल्याबद्दल भारतीय लष्कराचा गौरव करण्यासाठी हा विजयोत्सव साजरा करणार आहोत.” पंतप्रधान मोदींनी संसदेत दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत, हा विजयोत्सव साजरा करणे प्रत्येक देशभक्त नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत आगामी दोन महत्त्वाच्या अभियानांवर भर देण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाईल. यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार असून, लहान मुलांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. त्याचबरोबर ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमासाठी शहरातून 1 लाख 45 हजार राख्या पाठवण्यात येणार असल्याची माहितीही काटे यांनी दिली. हा कार्यक्रम सामाजिक सलोखा आणि बंधुत्व वाढवणारा असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भाजप पिंपरी-चिंचवडतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्षाबंधन उत्सव, तिरंगा यात्रा, हर घर तिरंगा अभियान, स्वातंत्र्य सैनिक स्मारक स्वच्छता अभियान आणि १४ ऑगस्ट रोजी अखंड भारताचे स्मरण करण्यासाठी विभाजन विभीषिका दिवस साजरा करण्यात येणार आहे. शहरात प्रत्येक मंडल निहाय हर घर तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे, तसेच शहरातील नागरिकांना तिरंगा वाटप करण्यात येणार आहे. तसेच, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांच्या स्मारकाचे स्वच्छता अभियान संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे.
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, पाटील बुवा चिंचवडे, विजय शिंदे, शैला मोळक, सुजाता पालांडे, राजू दुर्गे, मोहन राऊत, सनी बारणे, सोमनाथ तापकीर, हर्षल नढे, गणेश ढोरे, अमोल डोळस, मंगेश धाडगे, धरम वाघमारे, जयदिप खापरे, अजित बुर्डे, अमोल डोळस, रामदास कुटे, अनिता वाळूंजकर, विनायक गायकवाड, केशव घोळवे, सुरेश भोईर, सिद्धेश्वर बारणे, चेतन भुजबळ, बाबासाहेब त्रिभुवन, योगिता नागरगोजे, शर्मिला बाबर, वैशाली खाडेय, बिभीषण चौधरी, रवींद्र देशपांडे, भूषण जोशी, सचिन राऊत, समीर जावळकर, कुंदा भिसे, सुनिता जगताप, सीमा चव्हाण, रेखा हेगडे, जयश्री मकवाना, नूतन चव्हाण, शुभांगी भिसे, गायत्री तळेकर, नंदकुमार भोगले, विठ्ठल भोईर, विजय शंकर, दशरथ शिंदे, यशवंत दनाने, विनोद पाटील, सुभाष फाटक, दत्तात्रय यादव, संतोष रणसिंग, रेखा काटे, दिपाली कलापुरे, सुप्रिया चांदगुडे, प्रीती कामतीकर, रंजना पाटील, किरण पाचपांडे, अनघा रुद्र, रामदास काळजे, दत्तात्रय तापकीर, शेखर चिंचवडे, संतोष तापकीर, प्रतिभा जवळकर, भारती सोनवणे, कविता कोल्हापुरे, गुलजार सय्यद, लक्ष्मी काची, अनिता चोपडे, सोनाली सायकर, वर्षा गायकवाड, वंदना आल्हाट, मंजू गुप्ता, रत्नमाला देवमाने, आप्पा खुडे, केशव कोल्हापुरे, समीर शिकलगार, नामदेव पवार, विठ्ठल पोळ, राजश्री वेताळ, मनीषा शिंदे, संभाजी गोफणे, संभाजी नाईकनवरे, जयश्री वाघेरे, सुरेश तावरे, अनिता भालेराव, दत्तात्रेय उकिरडे, शशिकांत जगताप, प्रमोद परदेशी, सुशांत पवार, रमेश विरनाथ, देविदास साबळे, प्रदीप साळवे, अनिता वाडेकर, अविनाश गावडे, जनार्दन तलारे, संतोष वाघमारे, मोनिका वाघमारे, सूर्यकांत मोहिते, पुरुषोत्तम काळे, वीरेन वाघमारे, सत्यपाल थोरात, रेखा काळे, रवींद्र काटे, शुभम पिंगळे, विवेक बारोट, दीपक भंडारी, चेतन बेंद्रे, सतीश शिलम, प्रदीप महाजन, अनिता बोर्डे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले.








