ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग ११ मध्ये परिवर्तनाची नांदी; महिलांनी व्यक्त केला निशा यादव यांच्यावर विश्वास

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा उमेदवार निशा दिनेश यादव यांच्या प्रचाराला महिलांचा निर्णायक पाठिंबा मिळताना दिसत आहे. तुळजाईनगर व नेवाळेवस्ती परिसरात राबविण्यात आलेल्या ‘घर टू घर’ संवाद उपक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

या संवादादरम्यान महिलांनी प्रभागातील पाणी, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, स्ट्रीट लाईट, तसेच महिलांसाठी सुरक्षितता व रोजगाराच्या संधी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर थेट चर्चा केली. महापालिकेच्या सभागृहात प्रभावी महिला प्रतिनिधित्व असावे आणि महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, अशी ठाम अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.
मनपा ‘कौशल्यम लाईटहाऊस’ उपक्रमाच्या माध्यमातून युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याचा निर्धार निशा यादव यांनी यावेळी जाहीर केला. भाजपा नेते व आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व वेळबद्ध प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रचारादरम्यान घरोघरी पत्रक वाटप करण्यात आले. माता–भगिनींनी औक्षण करत प्रेमळ स्वागत केले, तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. तरुण वर्गानेही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत प्रचाराला बळ दिले. यावेळी महिलांनी एकमुखाने “प्रभागाच्या विकासासाठी निशाताईंनाच निवडून देणार” अशी ठाम ग्वाही देत विश्वास व्यक्त केला.
“नागरिकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवतींना संधी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य राहील,” असे स्पष्ट मत निशा दिनेश यादव यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये महिलांचा वाढता पाठिंबा आणि जनतेचा विश्वास पाहता, निशा यादव यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button