भाजपाकडे अर्ज जमा करून निशा यादव निवडणूक रणांगणात! – निशा यादव यांनी केला शहरातील पहिला अर्ज जमा
ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिली प्रभाग विकासाची ग्वाही

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ११ मधील सेवाभावी कार्यासाठी ओळख असलेल्या इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा (निशाताई) यादव यांनी मंगळवारी (दि. 9)
भारतीय जनता पक्षाकडून अधिकृतरित्या अर्ज जमा करून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पक्षाच्या स्थानिक कार्यालयात झालेल्या या प्रक्रियेला महिला कार्यकर्त्या, युवक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी प्रभाग विकासाची ग्वाही दिली.
निशा यादव या भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या सौभाग्यवती असून, प्रभागातील स्वच्छता, महिला सक्षमीकरण, स्थानिक विकास, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा अर्ज आज जमा केला. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस मोरेश्वर शेंडगे,मधुकर बच्चे उपस्थित होते.
अर्ज जमा केल्यानंतर बोलताना निशाताईंनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करत नागरिकांना विश्वास दिला की, ‘‘विकासकामे, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी संधी या प्रत्येक बाबींवर आम्ही प्रामाणिकपणे काम करू. प्रभाग क्रमांक ११ मधील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे. जनतेच्या सहकार्याने आपला प्रभाग आदर्श प्रभाग बनवण्याचे स्वप्न आम्ही निश्चितपणे पूर्ण करू.’’
लाडक्या बहिणींकडून स्वागत
इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून निशाताई यादव यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम महिलांसाठी राबवले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीकडून निशाताई यादव यांना जोरदार पाठिंबा आहे. प्रभागातील स्थानिक महिलांनी आणि नागरिकांनीही निशाताईं शुभेच्छा देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी निवडणुकीत निशाताई यादव यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वाढल्याने प्रभागातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराला विकासाची गती मिळाली आहे हीच विकासाची गती कायम ठेवण्यासाठी भाजपा पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. आगामी काळात भाजपच्या ध्येय धोरणानुसार सबका साथ सबका विकास याच तत्वावर काम करायचे आहे. आमदार महेश लांडगे यांच्या विकसित शहराच्या संकल्पनेला हातभार लावायचा आहे.
निशा दिनेश यादव
इंद्रायणी महिला प्रतिष्ठान




















