बेसिक टीम व महानगरपालिकेच्या ड प्रभागाच्या आरोग्य विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी पालिकेच्या शाळेमध्ये जनजागृती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बेसिक्स टीम व म.न.पा द्वारे हर घर तिरंगा,हर घर स्वच्छता मोहिमे अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी वार्ड 29 मधील मनपा शाळा क्रमांक 54 पिंपळे गुरव येथे जनजागृती करण्यात आली.
यावेळी बेसिक टीमचे झोन इन्चार्ज सुखदेव लोखंडे
यांनी सांगितले कि,काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सव असावा,असे आवाहन विविध स्तरांतून करण्यात येत होते. गणपती उत्सवानंतर शहरातल्या नद्या,विहिरी आणि सगळे पाणवठे एकसारखे दिसायचे ते म्हणंजे पाण्यावर तेलमिश्रित रंगांचा तवंग, तरंगणारं निर्माल्य,अर्धवट विघटन झालेल्या मूर्ती, सजावटीचे साहीत्य,प्लास्टिक,थर्माकोल हे असं चित्र दिसायचे म्हणून आम्ही शाळेत जाऊन जनजागृती करण्याचे ठरवले असे लोखंडे यांनी सांगितले.
आण्णा जोगदंड म्हणाले की, मूर्ती दान करण्यापासुन ते मुळात पर्यावरणपूरक मूर्तीच बनवा, 500 वर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकच्या वापराला स्पष्ट नाही म्हणा असा संदेश पिंपळे गुरवच्या शाळेतील मुलांना देऊन तुम्ही तसे आपल्या आईवडिलांना प्लॅस्टिक न वापरण्यासाठी आग्रह धरा व त्यांना सांगा असे जोगदंड यांनी सांगितले .
यावेळी टीम बेसिक्सचे कर्मचारी वार्ड इन्चार्ज विजय पेंडे यांनी सांगितले की आम्ही दर आठवड्याला व गणेशोत्सवातसुद्धा अशी जनजागृतीचे कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले .
पर्यावरणपूरक मूर्ती म्हणजे काय? पर्यावरणपूरक गणपती मूर्ती म्हणून मातीच्या गणपतीची ओळख आहे. तर, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ओळखली जाते.आता माती आणि पी.ओ.पीला पर्याय म्हणून हळदीचा,नारळाच्या काथ्या किंवा शेंड्यांचा वापर करून तयार केलेला गणपती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती याचा वापर करण्याचा सल्ला मुख्याध्यापिका मालन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी बेसिक्स टीमचे झोन इन्चार्ज सुखदेव लोखंडे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड,मुख्याध्यापिका मालन गायकवाड, उपमुख्यध्यापिका-धनश्री चौगुले ,वार्ड इन्चार्ज विजय पेंडे ,बेसिक्स टिमचे दीपक चौरे,मारुती कांबळे, शांतीसागर पाटील, शुभम बेंद्रे, विवेक जावीर यांनी सहभाग नोंदवला.
क्षेत्रिय अधिकारी.,अमित पंडित ,सह.आरोग्य अधिकारी शांताराम माने ,मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे ,
आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्याचे बेसिक टीमचे झोन इन्चार्ज सुखदेव लोखंडे यांनी सांगितले.








