छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त रहाटणीतील आनंद बुद्ध विहारात अभ्यासिकेचे उदघाटन
आमदार शंकर जगताप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स यांचे मोलाचे सहकार्य

माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त रहाटणीतील आनंद बुद्ध विहार येथील तक्षशिला ग्रंथालयात नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यासाठी आमदार शंकर जगताप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यापूर्वी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आनंद बुद्ध विहार याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले होते. त्याच ग्रंथालयात या अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले. या अभ्यासिकेसाठी आमदार जगताप यांच्या वतीने ५०० स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली आहे. तर अरुण पवार यांच्या वतीने संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत, या अभ्यासिकेच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. ही अभ्यासिका आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, विद्यार्थ्यांना शांत आणि प्रेरणादायी वातावरणात अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देईल.
यावेळी आनंद बुद्ध विहारचे अध्यक्ष महादेव कांबळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सचिव पोपट कदम, संघटक सखाराम कांबळे, गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंखे, महेंद्र गायकवाड, शशिकांत शेलार, केशव साळवे, मनोहर लांडगे, प्रवीण लोखंडे, गजेंद्र खडसे, श्री. उगले, विजय कांबळे, जयवंत रोकडे, वैभव माने, अनिल ईदे, अमोल उंडे, चंद्रकांत पाटील, प्रताप मोरे, माऊली निंबाळकर, प्रमोद गायकवाड, रमेश जाधव, संजय उबाळे, श्री. प्रियदर्शनी, अरुण चाबुकस्वार, प्रकाश सूर्यवंशी, बौद्धचार्य पानपाटील, काटे पिंपळे बुद्ध विहारचे अध्यक्ष विजय जगताप, भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष वसंत धेंडे, राजेंद्र खडसे, अंजना कांबळे, अनिता साळवे, अलका लांडगे, रामभाऊ मुळे, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, तसेच स्थानिक समाजबांधव, विद्यार्थी व महिला उपस्थित होते.













