ताज्या घडामोडीपिंपरी

महाराष्ट्रातील पहिल्या पेट्रोल ते इलेक्ट्रिक रूपांतरित रिक्षेचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदूषणमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदूषण नियंत्रण आणि हरित ऊर्जा धोरणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि इलेक्ट्रोमोशन कंपनीने संयुक्तरित्या महाराष्ट्रातील पहिली पेट्रोल रिक्षा इलेक्ट्रिक रूपांतरित रिक्षा तयार करून घेतली. या रिक्षेचे औपचारिक लोकार्पण पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते हिरवा ध्वज दिखवून करण्यात आले. या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने रिक्षाचालक वर्गाचा मोलाचा योगदान ठरणार असून, राज्यातील इतर भागांसाठीही हा आदर्श ठरेल.
या रिक्षेचे रूपांतर इलेक्ट्रोमोशन कंपनीच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड शहरात घडवण्यात आले असून, ती पूर्णपणे इलेक्ट्रिक ऊर्जेवर कार्यरत आहे. सर्व कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करून ही रिक्षा हट्ट्याच्या (क्षेत्रीय वाहतुकी कर प्राधिकरण) वतीने अधिकृत परवानगीसह रस्त्यावर धावण्यास पात्र ठरली आहे. ही रिक्षा जुन्या पेट्रोल रिक्षेचे इलेक्ट्रिक कन्व्हर्शन किट फिटिंगद्वारे रूपांतरित करण्यात आली असून, ती महाराष्ट्रातील पहिली अशी वाहन आहे जी पेट्रोल ते इलेक्ट्रिक रूपांतराची यशस्वी उदाहरण ठरली. उद्यापासून ही रिक्षा पिंपरी-चिंचवड शहरात प्रवाशांना सेवा देण्यासाठी रस्त्यावर धावणार असल्याने, स्थानिक वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणस्नेही चालना मिळेल.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोरवाडी मार्गे महात्मा फुले स्मारकापर्यंत रिक्षा रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो रिक्षाचालक सहभागी झाले असून, हा उपक्रम प्रदूषण कमी करण्याच्या जनजागृतीसाठी उपयुक्त ठरला.
 कार्यक्रमास महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व गोरगरीब कष्टकरी वर्गाचे नेते डॉ. बाबा कांबळे, महाराष्ट्र राज्य कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, ऑटो-टॅक्सी-ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंडा, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, इचलकरंजी येथून स्वामी बिलूर, ठाणे येथील राजू ढेकण, बदलापूर येथून प्रवीण भोसले, इलेक्ट्रिक मोशनचे सूर्या सिंग, जिल्हा कार्याध्यक्ष जाफर भाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष सुरज सोनवणे, शहर कार्याध्यक्ष विशाल ससाने, बालाजी गायकवाड, उपाध्यक्ष पप्पू गवारे, संघटक दत्ता गेले, पुणे शहर कार्याध्यक्ष विलास त्यांच्या पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे, विशाल भोंडवे, प्रवीण शिखरे अंथोनी फ्रान्सिस, गणेश कांबळे, डी मार्ट रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुनील कदम,लोणावळा बाबुभाई शेख शहराध्यक्ष आनंद सदावर्ते, चाकण येथील कैलास नाना वालांडे, राजू शिंदे, पिंपळे सौदागर विभाग अध्यक्ष बबन काळे,अनिकेत कड, सोमनाथ येळवंडे,सिद्धार्थ साबळे, सोपान पवळे, नंदू शेळके, सुखदेव लष्करे, किशोर कांबळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत अग्रेसर भूमिका घेतली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत पर्यावरणस्नेही विकासाच्या दिशेने प्रगती करत आहे. पेट्रोल-डिझेल मुक्त भारताच्या ध्येयासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवले असून, त्यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. रिक्षाचालकांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक अडचणी येत असताना, जुन्या रिक्षांना इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. रिक्षाचालकांनी हा बदल स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच, महाराष्ट्र रिक्षा पंचायत व डॉ. बाबा कांबळे यांचे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांना सहकार्य देण्याबद्दल विशेष अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या इलेक्ट्रिक रूपांतरित रिक्षेचे उद्घाटन माझ्या हस्ते होणे, हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे.”
कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय रिक्षाचालक वर्गाने घेतला असून, आता आमच्या रिक्षाही इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालवून प्रदूषणमुक्त भारताच्या ध्येयासाठी योगदान देणार आहोत. यासाठी आम्हाला केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. नवीन रिक्षांसाठी परमिट नसल्याने आमचा नवीन इलेक्ट्रिक रिक्षांना विरोध आहे; मात्र जुन्या रिक्षांचे रूपांतर करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. यामुळे भविष्यात अनेक रिक्षा इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करता येतील व नवीन रिक्षांसाठी अनावश्यक शक्ती वाटप टाळता येईल. ही मागणी आम्ही कायदेशीर मार्गाने मांडत आहोत.”
हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत करणारा ठरला असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पर्यावरण संरक्षण व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी घेतलेल्या या पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी असा आणखी अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button