चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
महानगरपालिका निवडणुकीकरीता वॉर्ड स्तराच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करा – बी. एम. संदीपकुमार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक २०२५ करीता शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजना बाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह-प्रभारी श्री बी एल संदीप कुमार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक डांगे चौक, थेरगाव येथे घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह-प्रभारी श्री बी एल संदीप कुमार यांना पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
महानगरपालिकांच्या निवडणूक अनुषंगाने राज्यभरामध्ये प्रदेश काँग्रेस पक्षाकडून प्रभारी यांची नियुक्ती करून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्याचा आढावा घेण्यात येत आहे. विशेषतः ब्लॉक कमिटीच्या कार्याचा आढावा, सर्व सेल व विभाग यांच्या अध्यक्षांशी व्यक्तीगत चर्चा आणि आगामी काळामध्ये काँग्रेसच्या असलेल्या नियोजना संदर्भामध्ये ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण मानली गेली. या बैठकीमध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही ब्लॉकच्या अध्यक्षांनी आपापल्या ब्लॉकचा अहवाल प्रभारींकडे सादर केला.
प्रदेश काँग्रेस ठरवेल त्याप्रमाणे आघाडी किंवा स्वतंत्र निवडणुका लढण्याची तयारी शहर काँग्रेस कमिटीची आहे. पिंपरी चिंचवड शहरात पक्ष अतिशय ताकदीने सर्व जागा लढण्यास सज्ज आहे असे प्रतिपादन यावेळी सह-प्रभारी बी एम संदीप कुमार यांनी केले. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा तसेच सामान्य युवकांना संधी मिळावी याकरिता त्यांना तिकीट देऊन नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल, त्यासाठी स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करावे अशा सूचना सह-प्रभारींनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. महानगरपालिका निवडणूकीकरिता पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीचा विचार हा संघटना व प्रभाग स्तरावर केलेल्या कामांवर निश्चित केला जाईल असे सह-प्रभारी यांनी भाषणात सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये चांगल्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्याचे आश्वासन यावेळी शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी दिले.
याबैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे, श्यामला सोनवणे, भाऊसाहेब मुगुटमल, अभिमन्यु दहितुले, बाबू नायर, तुकाराम भोंडवे, गौतम आरकडे, किशोर कळसकर, मनोज कांबळे, अमर नाणेकर, वाहब शेख, सायली नढे, कौस्तुभ नवले, मयूर जयस्वाल, अॅड.अनिरुध्द कांबळे, अबूबकर लांडगे, प्रा.किरण खाजेकर, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, गौरव चौधरी, केनिथ रेमी, सचिन कोंढरे पाटील, सज्जी वर्की, अॅड.उमेश खंदारे, मुन्साफ खान, बाबासाहेब बनसोडे, अर्चना राऊत, डॉ.मनिषा गरुड, निर्मला खैरे, शीतल कोतवाल, ज्योती गायकवाड, स्वाती शिंदे, प्रतिभा कांबळे, अरुणा वानखडे, संदेश नवले, उमेश बनसोडे, अशोक मंगल, रशिद अत्तार, महादेव वाळूंजकर, विशाल कसबे, याकुब इनामदार, विशाल सरवदे, चंद्रकांत लोंढे, निखिल भोईर, चंद्रशेखर जाधव, विरेन्द्र गायकवाड, मजहर खान, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, अॅड.अशोक धायगुडे, रवि नांगरे, सतीश भोसले, वसंत वावरे, योगेश बहिरट, कुंदन कसबे, भरत वाल्हेकर, फिरोज तांबोळी, अॅड. हर्षद ओव्हाळ, विजय ओव्हाळ, अॅड.मोहन अडसूळ, गौतम ओव्हाळ, किरण नढे, आकाश शिंदे, जितेंद्र छाबडा, भास्कर नारखडे, भिमराव जाधव, आप्पासाहेब सोनावणे, पांडुरंग जगताप, सोनु शेख, शौकत अली शेख, आशुतोष खैरे, प्रवीण कांबळे,गोरखनाथ लोहार, इरफान शेख, फिरोज शिकलकर, विकास कांबळे, बाबूलाल वाघमारे विनायक गंगावणे, साहेबराव थोरात, रिजवाण खान आदींसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.












