ताज्या घडामोडीपिंपरी

“नियमित करदात्यांना अन्याय नको – अगावू भरलेला कर एकरकमी परत द्यावा” माजी नगरसेवक अतुल शितोळे यांची मागणी

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात नियमितपणे शास्तीसह मालमत्ता कर भरलेल्या नागरिकांचा अन्याय दूर करून, त्यांनी भरलेली अगावू रक्कम दरवर्षीच्या करामध्ये समायोजित न करता थेट एकरकमी परत द्यावी, अशी ठाम मागणी माजी नगरसेवक अतुल शितोळे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या हद्दीत औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले असून, त्यावर पूर्वी शासन निर्णयानुसार शास्तीसह मालमत्ता कर आकारण्यात येत होता. मात्र, दिनांक ३ मार्च २०२३ रोजी नगरविकास विभागाने एक निर्णय घेतला आणि सर्व अवैध बांधकामांवरील शास्ती रक्कम माफ करण्यात आली.
या निर्णयामुळे अनेक नागरिकांनी पूर्वी भरलेली शास्तीसह कररक्कम महापालिकेकडे जमा राहिली आहे. सांगवी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश गणपत खोत (वय ७८) यांचा सुमारे ४.५ लाख रुपयांचा अगावू कर आजही महापालिकेकडे आहे. त्यांचा वार्षिक मालमत्ता कर सध्या ९,१०५ रुपये असल्यामुळे त्यांच्या संपूर्ण रकमेचे समायोजन होण्यासाठी सुमारे ४५ वर्षांचा कालावधी लागणार आहे.
“सदरील परिस्थिती ही अन्यायकारक असून, अशा ज्येष्ठ आणि नियमित करदात्यांनी भरलेली रक्कम थेट त्यांच्या खात्यात एकरकमी परत करण्यात यावी,” असे शितोळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अशा नागरिकांवरील अन्याय दूर करून महानगरपालिकेने त्यांच्याविषयी न्याय्य भूमिका घ्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button