अष्टविनायक मंडळातर्फे नेत्र तपासणी शिबिरात मोतीबिंदू असणाऱ्यांना मोफत ऑपरेशन करणार – अजिंक्यराज दिलीप काटे

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेश उत्सवानिमित्त (शनिवार दि. 30 ऑगस्ट 2025) दापोडीतील अष्टविनायक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबीर, व मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशंभो रक्तपेढी पुणे यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक प्रमाणपत्र तसेच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा पाच लाखाचा अपघाती विमा चे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी या शिबिरासाठी ब्लड बँकेतर्फे गणेश जाधव, ज्योतीराम जाधव,अथर्व सारख लता चव्हाण,निकिता घोरपडे यांनी सहकार्य केले. शिबीराचे उद्घाटन सतीश सदाशिव काटे, दिलीप सदाशिव काटे व रमेश आनंद मुसूडगे यांनी केले. यावेळी एकूण 49 जणांनी रक्तदान केले व 52 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष अजिंक्यराज दिलीप पाटील यांनी सांगितले की या शिबिरामध्ये ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचं मोफत शस्त्रक्रिया मंडळ तर्फे करण्यात येणार आहे या शिबिरासाठी ऋषिकेश मुसूडगे, प्रसन्ना साबळे, श्री काटे, स्वप्निल काटे, वसंत काटे, सौरभ काटे, यांनी मदत केली.















