ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे –  डॉ. अशोककुमार पगारिया

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुटुंब, समाज, धर्म, संस्कृती, शिक्षण आणिअर्थकारण या समाज घटकांना सशक्त आणि निकोप करण्यासाठी समाज घटकाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर करावा. आज नैतिक मूल्यांची मोठी पडझड होताना आपण प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत . गतकाळातील इतिहासाला साक्षी ठेवून संस्कार मूल्य आचरणात आणण्याची खरी गरज आहे. चंगळवाद आणि स्वैराचार यांना मूठमाती दिल्याशिवाय सुजाण आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रितम प्रकाश
महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ या दोन दिवशीय कार्यशाळेच्या
व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मा. अमृता देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सदाशिव
कांबळे, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या प्रमुख डॉ. स्वाती वाघ, आणि कराटे प्रशिक्षक ध्रुव देशपांडे उपस्थित होते.

या दोन दिवसीय कार्यशाळेच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मा. अमृता देशपांडे यांच्या व्याख्यानाने
गुंफले गेले. याप्रसंगी कायद्याचा वापर जबाबदारीने करावा. बेजबादारपणे कायद्याचा वापर केला तर
समाज, धर्म आणि संस्कृतीची हानी होते. कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत असेल तर कायद्याचा जाणीवपूर्वक गैरफायदा घेतला जात आहे. कायद्याच्या दुरुपयोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कायद्याचा वापर अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी जरूर करावा. न्याय देवतेकडून न्याय लवकरात लवकर दिला जावा.

काही वेळेला न्यायाची वाट पाहण्यात आयुष्य खर्च होत असेल तर त्याचा काय उपयोग ? असा प्रति प्रश्न
मा.अमृता देशपांडे यांनी विद्यार्थ्यांसमोर उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या भौतिक व
वैज्ञानिक तंत्रज्ञान युगामध्ये सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल तर इतिहासातील नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व यांचे स्मरण करावे लागले. जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, आणि अहिल्याबाई होळकर यांचा
जीवनपट जाणून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ध्रुव देशपांडे यांनी मुलींसाठी कराटे प्रात्यक्षिकाचे
प्रशिक्षण घेतले.

या दोन दिवसीय कार्यशाळेच्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प. मा . डॉ . स्वप्नाली धोका यांनी गुंफले.
याप्रसंगी महिलाच्या आरोग्यमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यच्या गरजा पूर्ण
करण्यासाठी पौष्टिक आहार, व्यायाम, ताणतणाव मुक्त व्यवस्थापन, नियमित आरोग्य या गोष्टीची
तपासणी करणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख डॉ. स्वाती वाघ यांनी केले तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. विभा ब्राह्मणकर तर आभार प्रा. रेणू अग्रवाल यांनी
मानले.या कार्यक्रमाला प्रा.डॉ.विजय निकम, डॉ. हनुमंत शिंदे, प्रा. प्रवीण म्हस्के, प्रा.सचिन पवार, व
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button