भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर वतीने प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपुजन व चारा वाटप कार्यक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथील शंभूराजे गोशाळा येथे गोपुजन व चारा वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात गोमातेचे पूजन केले व गाईंसाठी चारा वाटप करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले होते. शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या वेळी भाजयुमो पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘गोमाता की जय’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी उपस्थित युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश भाऊ यादव प्रदेश सचिव अजित जी कुलथे
मंडल अध्यक्ष शिवराज भाऊ लांडगे युवा मोर्चा मंडल अध्यक्ष उदय भाऊ गायकवाड, पंकज शर्मा, आशिष राऊत, प्रमोद पठारे, मंगेश लोहारे प्रकाश चौधरी, अभिजीत बागुल, अजय मोरे, अतुल राक्षे, निखिल पाटील, किरण माळी, अमित महाडिक, आदम मुलांनी, प्रतिक रामगुडे, ओंकार पवार, शिवम साबळे, रोहीत स्वामी, प्रतीक भालेराव, शेखर पोद्दार, तन्मय भाडळे. आदी युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.













