साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नामवंत व्याख्यात्यांची व्याखाने, शाहिरी,विचारवंतांचे परिसंवाद,गीत गायन,गझल,कवीसंमेलन तसेच सांस्कृतिक गीते तसेच इतर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा दरवर्षीप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात होणाऱ्या या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (शुक्रवार) सकाळी ९.३० वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी,सुनेत्रा पवार,सुप्रिया सुळे,श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे,शंकर जगताप,महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य,माजी नगरसदस्या तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जीवनावर आधारित शाहीरी, व्याख्यान,गझल,तसेच लोकगीते,सांस्कृतिक गीते कवीसंमेलन,भक्तिगीते, पारंपारिक वाद्यांचे वादन,महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, एकपात्री प्रयोग,लोककला महाराष्ट्राची असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
चौकट –
विचार प्रबोधन पर्वाचे वेळापत्रक
शुक्रवार ०१ ऑगस्ट २०२५
स. ९.०० वा. साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील प्रतिमेस तर स. ९.३० वा. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या भक्ती शक्ती चौक येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
सनई वादनाने दररोज कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
सनई वादन-संयोजक दत्तू चव्हाण
हलगी वादन – येडेश्वरी हलगी ग्रुप सादरकर्ते- सागर यादव
स. ९.३० वा.गीत गायनाचा कार्यक्रम – स्वर चंदन
सादरकर्ते – चंदन कांबळे
स. १०.३० वा. शाहिरी जलसा
सादरकर्ते -लेखणीचा बादशाह – बापू पवार
स. ११.३० वा. स्वरांश हा सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते- शेखर साळवे
दु. १२.३० वा. हिंदी मराठी नव्या जुन्या गाण्यांचा कार्यक्रम
सादरकर्ते -अविनाश होरे
दु. १.३० वा. “हसा व निरोगी रहा” तणावमुक्ती कार्यक्रम,सादरकर्ते- महाराष्ट्राचे हास्य सम्राट चॅनेल स्टार
– जॉली रावत, दिव्येश शिरवंडकर, राजदीप कदम,सत्यपाल कदम
सायं. ३.०० वा. बॅन्ड स्पर्धा स्पर्धेचे आयोजन
संयोजक – नाना कांबळे
सायं. ५.०० वा.उद्घाटन समारंभ
सायं. ५.३० वा. “डक्कलवारांचे बसव पुराण” हा प्राचीन संस्कृतीचा वेध घेणारा दुर्मिळ कार्यक्रम
सादरकर्ते – धर्मा डक्कलवार
सायं. ६.०० वा. मेरा भारत महान देशभक्तीपर गीते व इतर गीते
-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका ममता नेणे सादरकर्ते राजू जाधव
रात्री ८.०० वा. भक्तीगीते भावगीते लोकगीते हा २५ कलाकारांचा कार्यक्रम
सादरकर्ते -वर्षा पवार, सुजाता कांबळे.
शनिवार २ ऑगस्ट २०२५
स. ९.०० वा. – सनई वादन
संयोजक – सुरेश जोगदंड, बाबू पाटोळे .
स. १०.०० वा.प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते – पल्लवी घोडे
स. ११.०० वा. “गीते – अण्णा भाऊंची ”
सादरकर्ते – मोहम्मद रफी शेख
दु. ११.३० वा गजल कार्यक्रमाद्वारे अण्णा भाऊंना वंदन
सादरकर्ते – अशोक गायकवाड
दु. १२.३० वा. ” लहूजी वस्ताद साळवे – एक थोर क्रांतीगुरू ” या विषयावर व्याख्यान
व्याख्याते – विशाल मराठे
दु. १.०० वा. साहित्यसम्राटास गीतातून अभिवादन
सादरकर्ते – धिरज वानखेडे
दु. २.०० वा.लोक गीतांचा १५ कलाकारांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
सादरकर्ते – भाऊ बापू (मांग) कलापथक नारायणगावकर
दु. ३.०० वा. परिसंवाद विषय- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान
सहभाग – १) प्रा. प्रदीप कदम २) प्रा. बालाजी कांबळे (हिप्परगेकर) ३) संदिपान झोंबाडे ४) विजय हनवते,कामगार निरीक्षक ५) दिशा खिलारे
सूत्रसंचालन – अण्णा कसबे, आभार – नितीन घोलप
सायं. ५.०० वा. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे – एक थोर साहित्यिक या विषयावर व्याख्यान
व्याख्याते – सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील
सायं. ६.३० वा. अण्णांची विचारधारा गीते,सादरकर्ते – कामिनी खंडागळे
सायं. ८.०० वा. ही दौलत अण्णांची लोक गीतांचा भव्य कार्यक्रम
सादरकर्ते – सुनील नाईकवाडी
रविवार ०३ ऑगस्ट २०२५
स. ९.०० वा. सनई वादन
संयोजक – रामदास कांबळे, डी. पी खंडाळे
स. १०.०० वा.“होय मी सावित्री फुले बोलतेय” – एकपात्री प्रयोग
सादरकर्ते – उषा कांबळे
स. १०.३० वा. खेळ पैठणीचा कार्यक्रम लोकगीते,गायन,नृत्यकलाकारांसह, मानाची पैठणी ५० हून अधिक बक्षिसे
सादरकर्ते – श्री. के.डी.कड कार्यक्रमाचे संयोजक – माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप व ज्योती वैरागर
दु. १.३० वा.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीते
सादरकर्ते – रणजीत खंडागळे, निलेश देवकुळे
दु. ३.०० वा.परिसंवाद विषय- अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरणाची दिरंगाई ?
सहभाग – १) गणपत भिसे २) विजय बगाडे ३) भाऊसाहेब अडागळे ४) प्रतिभा भाळके
सूत्रसंचालन – सतीश भवाळ, संजय ससाणे
दु. ५.०० वा.६५ कलाकारांचा भव्य दिंडी महोत्सव
सादरकर्ते :- श्री.विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळ, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग
दु. ७.०० वा.“लोकगीतांचा भव्य कार्यक्रम”
सादरकर्ते – आरती पुणेकर
सायं. ८.०० वा.”मराठी साज हा कलेचा बाज” मराठी गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते – मिठू पवार
………
सोमवार (०४ ऑगस्ट २०२५)
स. ९.०० वा. सनई वादन
संयोजक – आशाताई शहाणे, केसरताई लांडगे
स. १०.३० वा.“स्वर्ण लहरी” – ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम
सादरकर्ते – अनिकेत जवळेकर
स. ११.३० वा. क्रांतिकारी गीते अण्णा भाऊंची सादरकर्ते – क्रांती येडके व विशाल लोंढे
दु. ०१.०० वा. ओल्ड इज गोल्ड ऑक्रेस्टा नवीन जुन्या गीताचा कार्यक्रम
सादरकर्ते – चंद्रकांत नगरकर
दु. ३.०० वा. परिसंवाद विषय- १८७१ चा गुन्हेगारी जमातीचा कायदा आणि त्यांचे झालेले मातंग समाजावरील परिणाम
सहभाग १) डॉ. धनंजय भिसे २) अजित केसळेकर ३) प्रदीप मोहिते ४) ॲड. किरण जावीर (पुणे)
सूत्रसंचालन – युवराज दाखले आभार- संजय धुतडमल
सायं. ५.०० वा. “लोकगीतांचा भव्य कार्यक्रम”
सादरकर्ते- संगीता लाखे, शशिकांत कोठावडे
सायं. ७.०० वा. संतवाणी अण्णांची -.सुप्रसिद्ध गायक.चंद्रकांत प्रल्हाद शिंदे,सादरकर्ते – गायक पल्लवी पत्की ,
रात्री ८.०० वा. “लोककला महाराष्ट्राची”
महाराष्ट्राची लोक संस्कृती जपणारा मराठमोळा कार्यक्रम सादरकर्ते सोनाली म्हस्के
मंगळवार ०५ ऑगस्ट२०२५
स. ९.०० वा. सनई वादन संयोजक – अण्णा लोखंडे माजी नगरसदस्य भगवान शिंदे
स.९.३० वा.प्रबोधनपर गीते जयश्री कांबळे
स. १०.०० वा.वंदन साहित्यांच्या शिल्पकारांना सुपरस्टार
कलाकार – सार्तक शिंदे, दर्शन जावळे, दिव्या गायकवाड
सादरकर्ते- शितल चव्हाण
दु. १२.०० वा.गौरव अण्णांचा.महेश भांबिड व शिल्पा पांचाळ
दु. १२.३० वा.गौरव गाथा अण्णांची
सादरकर्ते – दिगंबर गरुड व प्रियांका पुजारी
दु. १.०० वा. लोक गीतांचा कार्यक्रम
सादरकर्ते- काव्यभूमी संस्था
दु. ३.०० वा. परिसंवाद विषय- मातंग समाजाच्या विकासाची उद्दिष्टे
सहभाग १) आमदार अमित गोरखे २) मनोज तोरडमल ३) अरुण जोगदंड ४) इंजि.सचिन अडागळे, सूत्रसंचालन हनुमंत नाना कसबे आभार संजय ससाणे
सायं. ५.०० वा. अण्णांची गौरव गाथा
सादरकर्ते – बाळासाहेब निकाळजे , संजय मगर,
सायं. ६.०० वा.समारोप कार्यक्रम
सायं. ६.३० वा.लोकगीते
सादरकर्ते – चित्रसेन भवार व महादेव तुकाराम मस्के
सायं. ८.०० वा.गौरवशाली अण्णांची गाथा २५ नृत्य कलाकारांचा भव्य कार्यक्रम
सादरकर्ते – शैलेश लोखंडे
बुधवार ०६ ऑगस्ट २०२५
स. ११.०० वा. – निमंत्रित कवींचे कवि संमेलन
संयोजक – सुनिल भिसे
ठिकाण – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी
या विचार प्रबोधन कार्यक्रमास शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.














