ताज्या घडामोडीपिंपरी

मदत नव्हे कर्तव्य आहे – पालावरमध्ये राहणाऱ्या वंचित गोरगरिबांची दिवाळी गोड

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी ,पिंपळे गुरव भागात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मोकळ्या मैदानात पालामध्ये तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या  40 कुटुंबातील महिलांना दोन नवीन साड्या एक पैठणी तसेच लहान मुलांना गोड फराळाचे साहित्य देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. यापूर्वी आम्ही दिवाळीनिमित्त आदिवासी तसेच कातकरी समाजालच्या 60 कुटुंबाला मदत केली आहे तसेच दिवाळीत आम्ही शेतकऱ्यांनाही पूरग्रस्त भागात जाऊन मदत करणार असल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
सा.का.हेमंत नेमाडे म्हणाले कि, पालावर राहणाऱ् गोरगरिबांना फराळाचे आणि साड्याचे वाटप केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमची दिवाळी झाली असे आम्हाला वाटले आणि खूप आनंद झाला.
गुणवंत कामगार काळूराम लांडगे म्हणाले की खरोखरच गोरगरिबांना मदत गेल्या पंधरा वर्षांपासून ही संस्था करत आहे आणि या संस्थेचे काम मी अत्यंत जवळून पाहत आहे त्यांनी संस्थेच्या कार्यकर्तेचे भरभरून कौतुक केले .
मीना करंजावणे म्हणाल्या की सर्वसामान्य साठी धावून जाणारी आमची संस्था आहे, महिनाभर संस्थेचे पदाधिकारी अथक परिश्रम घेऊन लोकसहभागातून गोरगरीबासाठी मदत कार्यक्रम आयोजित करतात.
यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर ,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा मीना करंजवणे,खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर, गुणवंत कामगार  काळुराम लांडगे,सा.का. हेमंत नेमाडे, प्रा.चेतना नेमाडे,आयु नेमाडे ,सचिव गजानन धाराशिवकर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साळुंके,नंदकुमार धुमाळ,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button