आळंदीताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

अलंकापुरीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात आगमन

माऊलींच्या जन्मोत्सव ७५० व्या वर्षा निमित्त माऊलींचे मंदिरात संत तुकाराम महाराज संत पादुका भेट संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीत जोरदार स्वागत

Spread the love

थोरल्या पादुका मंदिरात पूजा व स्वागत ; आज आळंदीत आषाढी एकादशी

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात अलंकापुरीत आगमन झाले. परंपरेने सोमवारी ( दि. २१ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आळंदीतील एक दिवसाचे पाहुणचार घेत सोमवारी देहू नगरीकडे परतीचे प्रवासास वाटचाल करेल.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे वारीहून आल्यानंतर परंपरेने सुपूर्द करण्यात आल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले.

सोहळा आळंदीत प्रवेश प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, वेदमूर्ती चक्रांकित महाराज यांचे वंशज हंसराज चक्रांकित, अवधूत चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर,संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे,ज्ञानेश्वर घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, सचिन घुंडरे, विवेक घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महेश केदारी, महादेव रत्नपारखी, ज्ञानेश्वर पोंदे, आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, चरित्र संतीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते. आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून गर्दी करीत हरिनाम जयघोषात स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने सोहळा मोठ्या आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. माऊली मंदिरात आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त निलेश लोंढे महाराज, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, राजेंद्र उमाप,व्यवस्थापक माऊली वीर यांचेसह भाविक, वारकरी उपस्थित होते.

आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या, पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह,भ.प. अवधूत महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद परंपरेने वाटप करण्यात आला. यासाठी भाविकांनी मोठी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. अनेक दिवसांचे विरहा नंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे चैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी माधव खांडेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, श्रीधर कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, बापूसाहेब पठारे, सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून तसेच सोहळ्यात धाकट्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले.या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाल्याने कोणीही आजारी पडले नाही. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा आळंदीत आल्याचे उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले.

थोरल्या पादुका मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत आरती आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट च्या वतीने मंदिरात हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळाचे स्वागत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी केले.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार , राजाभाऊ चौधरी यांचा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, हिरामण बुर्डे, ह भ प रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर , बाळासाहेब चव्हाण, साहेबराव काशीद, माजी महापौर नितीन अप्पा काळजे आदी उपस्थित होते. दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी प्रभावी बंदोबस्त ठेवला होता. परिसरातील भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून दर्शन घेतले. मंदिर समितीचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत सुशोभित रांगोळीच्या पायघड्या टाकीत लक्ष वेधले. मंदिरात लक्षवेधी रंगावली व पुष्प सजावट करण्यात आली होती.

आळंदी पंढरपूर आनंद वारीत स्वच्छतेचीही वारी करण्यात आली. पंढरपूर वारीमध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. एक तरी ओवी अनुभवावी याप्रमाणे आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी. वारीच्या अप्रतिम अनुभूतीची संधी यावर्षी प्रत्यक्षात अनुभवली. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवतच होता. एवढ्या मोठ्या विशाल वारीमध्ये आपलं काहीतरी योगदान लाभलं या समाधानाने सर्व सेवक तृप्त झाले होते. स्वच्छता वारीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व सेवक पदाधिकाऱ्यांचे दिलीप महाराज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. या पुढील स्वच्छता मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात पदाधिकारी साधक, सेवक यांचे उपस्थितीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोहळ्यात उद्या सोमवारी ( दि. २१ ) आळंदीत आषाढी एकादशी साजरी होत आहे. तसेच संत तुकाराम महाराज यांचा वैभवी पालखी सोहळा आळंदीत एक दिवसाचा मुक्काम आणि पाहुणचार घेत हरिनाम गजरात देहू नगरीकडे मार्गस्थ होणार आहे. यावर्षी श्रींचे पालखी सोहळ्याचे पाठोपाठ संत तुकाराम महाराज यांचा वैभवी पालखी सोहळा आळंदीत प्रवेशला. सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख व विश्वस्त विक्रमसिंह मोरे यांचेसह पदाधिकारी, भाविक उपस्थित होते. आळंदी देवस्थान तर्फे वारकरी संप्रदायातील परंपरांचे पालन करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अलंकापुरीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा माऊलींच्या भेटीस
श्रींचे पालखी सोहळ्यांचे आळंदीत जोरदार स्वागत
श्रींचे पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडींचा प्रथमच आळंदीत सन्मान
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आळंदीत साजरा होत आहे. या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त आणि जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाच्या पावन पर्वावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी ने जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैभवी पालखी सोहळ्याचे प्रथा परंपरांचे पालन करीत जोरदार स्वागत केले. सोहळा आळंदीत रविवारी ( दि.२० ) हरिनाम गजरात एक दिवसाचे मुक्कामासाठी आगमन झाले. या ऐतिहासिक संतभेटीचे लाखो वारकरी, भाविक, नागरिक साक्षीदार ठरले. या अनुपम सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून भाविक, नागरिकांनी रस्त्याचे दुतर्फ़ा गर्दी करीत दर्शन घेतले.

यावर्षी जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी आळंदी देवस्थानचे निवेदन अर्जास प्रतिसाद देत श्रींचे पालखी सोहळ्याचा मार्ग बदलून देहू ला जाताना आळंदी मार्गे जाण्याचा तसेच एक दिवस आळंदीत मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे वारकरी संप्रदाय आणि समस्त आळंदीकर ग्रामस्थानी स्वागत केले. सोहळ्याचे वैभवी परंपरेस साजेल असा पाहुणचार आणि स्वागत आळंदीत करण्यात आले. समस्त काळेवाडी ग्रामस्थ आणि आळंदी ग्रामस्थ पंचक्रोशितील नागरिकांचे वतीने जोरदार स्वागत झाले. काळेवाडी आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज धाकट्या पादुका विसावा स्थान येथे दोन्ही पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्रींचे सोहळ्यातील संस्थानचे तसेच पालखी सोहळ्याचे पदाधिकारी, मालक, चोपदार, मानकरी, बैलसेवेचे मानकरी यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनात समस्त काळेवाडी ग्रामस्थ, आळंदी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वारकरी भाविक यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सभापती श्रीधर कुऱ्हाडे पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी भाविक वारकरी यांना अन्नदान सेवा रुजू केली. आळंदीत प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रथ सेवेच्या बैलजोडीचा सत्कार, सन्मान, पूजा, पुरणपोळी महानैवेद्य आणि झूल घालून हरिनाम गजरात झाला. यासाठी संयोजन माऊली भक्त प्रकाश काळे आणि काळेवाडी ग्रामस्थ यांनी केले.

आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ) आळंदीतील विविध सेवाभावी संस्था, मंडळे यांचे वतीने ठीकठिकाणी श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरेने स्वागत करण्यात आले. विविध ठिकाणी प्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले. आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ) येथे माजी विश्वस्त बिपीन चोबे, गजानन काळे, नरहरी महाराज चौधरी, विश्वस्त अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर आदींचे उपस्थितीत सोहळ्याचे स्वागत आणि मान्यवरांचे वारकरी परंपरेने श्री राम मंदिर, श्री लक्ष्मीनारायण विष्णू मंदिर, श्री हरिहरेंद्र मठ येथे सोहळ्याचे स्वागत आरती, श्रींची पूजा विविध रंगी पुष्पांचे पाकळ्या उधळीत करण्यात आली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन हरिनाम गजरात पिंपरी, चिंचवड, लांडेवाडी, भोसरीमार्गे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट विसावा घेत आळंदीत श्री संत धाकट्या पादुका मार्गे आळंदी मंदिरात समाज आरती नंतर एक दिवसाचे मुक्कामासाठी झाले. श्रींचा वैभवी सोहळा आळंदीत रात्री विसावला. अवधूत चक्रांकित महाराज परिवार, व्यापारी तरुण मंडळ, माऊली ग्रुप, अन्नछत्र मंडळ, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, अशोक लोढा, नंदकुमार वडगावकर, शिवतेज मंडळ, दिलीपशेठ खळदकर, मंगेश तिताडे, रोहिदास तापकीर, शिवसत्ता ग्रुप, माऊली घुंडरे पाटील आदींचे माध्यमातून भव्य अन्नदान सेवा परिश्रम पूर्वक रुजू झाली. माजी आजी उपाध्यक्ष वासुदेव घुंडरे, रमेश घुंडरे, रमेश वडगावकर, बबनराव भागवत कुऱ्हाडे आदींनी सोहळ्याचे स्वागत नगरपरिषद चौकात केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button