ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

आकुर्डी  डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये  उद्या IEEE ICEC2NT 2025 आंतरराष्ट्रीय परिषद

Spread the love
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आकुर्डी डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे ३ व ४ सप्टेंबर २०२५ रोजी “IEEE International Conference on Electronics, Computing and Communication Networking Automation Technologies 2025” (IEEE ICEC2NT 2025) ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
ही परिषद IEEE EDS Society च्या सहप्रायोजकत्वाने आणि IEEE पुणे सेक्शन च्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. परिषदेमध्ये भारतासह अमेरिका, थायलंड आदी देशांतील मान्यवर तज्ञ, प्राध्यापक व संशोधक सहभागी होणार असून इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, नेटवर्किंग व ऑटोमेशन या क्षेत्रांतील नविन संशोधन व तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास पद्मश्री डॉ. प्रह्लाद रामराव, ज्येष्ठ भारतीय संरक्षण वैज्ञानिक, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सन्माननीय पाहुणे प्रा. डॉ. अन्नप्पा बी, NIT सुरथकल,,डॉ. अनुराग श्रीवास्तव, वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी, अमेरिका,डॉ. नरुमोल चुमुआंग, थायलंड
डॉ. एस. एस. सर्णोबत, उपप्राचार्य, डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी,रिअर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. बी. बंदोपाध्याय, IIT जोधपूर,डॉ. महेश बुले, काईट फार्मा, लॉस एंजेलिस, अमेरिका, परिषदेचे संयोजक म्हणून डॉ. अमर बुचाडे (IEEE पुणे सेक्शनचे चेअरमन), डॉ.  पी. मालथी (प्राचार्य, डी. वाय. पाटील कॉलेज) आणि तेजस एस. पाटील (विश्वस्त) कार्यरत आहेत.
याशिवाय डॉ. प्रीती पाटील (प्रकाशन संयोजक), डॉ. रुतुजा देशमुख (आर्थिक संयोजक) व डॉ. बी. बी. मुसमाडे (कार्यक्रम संयोजक) यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
परिषदेसाठी प्रमुख आयोजन इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागांनी केले आहे.
या परिषदेच्या माध्यमातून देश-विदेशातील तांत्रिक तज्ज्ञ व संशोधक एकत्र येऊन नविन विचार, प्रकल्प आणि संशोधन सामायिक करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
परिषदेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला व संशोधन क्षेत्रातील योगदानाला नवी चालना मिळणार असून, संस्थेच्या आंतरराष्ट्रीय संबंधांनाही बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button