चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिंच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिं.चिं चे वतीने वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय सेक्टर २५ निगडी प्राधिकरण येथे  १० वी  व १२ वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जेष्ठ लेखक व व्याख्याते विवेकजी वेलणकर व महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी, माजी महपौर आर.एस. कुमार, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सलीम शिकलगार, अतुलजी इनामदार,राजेंद्र बाबर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता.

या कार्यक्रमामध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यांचा फुलस्केप वह्यांचा सेट व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समजातील काही होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात हातभार लावण्यासाठी शिष्यवृत्ती चे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी यांनी केले. जेष्ठ लेखक व व्याख्याते विवेकजी वेलणकर आणि महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी, युवा उद्योजक अश्विन इनामदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमात  अश्विन इनामदार यांची महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहर उद्योजक आघाडी युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस, दिलीप कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, ,प्रदेश चिटणीस संजय परळीकर, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिला अध्यक्षा सुषमा वैद्य, पुणे शहर महिला अध्यक्षा केतकी कुलकर्णी, भूषण जोशी, आनंद देशमुख,शामकांत कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी,  राहुल कुलकर्णी, वैभव खरे,अभय कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, अजित देशपांडे, प्रवीण कुरबेट,वैशाली कुलकर्णी,धनश्री देशमुख, संध्या कुलकर्णी, ऋजुता कुलकर्णी, अपर्णा खरे,संगीता कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, राजवाडे, सौ खरे, मधुवंती वखरे, वरदा बारसावडे, मंदार जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी यांनी केले तर आभार ब्रम्होद्योग चे प्रदेश उपाध्यक्ष राजन बुडुख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button