ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड दौरा ऐनवेळी रद्द, कार्यकर्त्यांचा हिरमोड

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आजचा (दि.०५) पिंपरी-चिंचवडमधील नियोजित दौरा अचानकपणे रद्द करण्यात आला. अजित पवार आज शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देणार होते त्याचबरोबर दर्शनाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. मात्र पावणे दोन वाजता अचानकपणे मुंबईला रवाना झाले. शहरातील जवळपास चाळीस मंडळांना भेटी देऊन दर्शन घेणार होते. मात्र दौरा रद्द झाल्यानं समर्थकांचा हिरमोड झाला.

शहरातील अनेक प्रमुख मंडळांनी अजित पवारांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती. सजावट, मंडप उभारणी, बॅनर्स-होर्डिंग्ज, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, अजित पवार आपल्या मंडळाला भेट देणार यामुळे वातावरण गजबजले होते. मात्र, दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांनाही मोठा हिरमोड झाला आहे.

हा दौरा का रद्द झाला, याबाबत अधिकृत कारण समजू शकलेले नाही. अजित पवारांचा हा दौरा रद्द झाला त्यानंतर अजित पवार मुंबईला रवाना झाले. १२.३० वाजता अजित पवार येणार होते, मात्र पावणे दोन वाजता अचानकपणे मुंबईला रवाना झाले. शहरातील जवळपास चाळीस मंडळांना भेटी देऊन दर्शन घेणार होते. मात्र दौरा रद्द झाल्यानं समर्थकांचा हिरमोड झाला.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. “अजितदादांचा दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून शहरातील मंडळांना भेट देण्याचा कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आला आहे,” असेही त्यांनी सांगितले आहे.

अचानक झालेल्या या बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणाच नाराजी दिसून येत आहे. दोन दिवसांपासून आम्ही स्वागताची तयारी करत होतो. पण अखेर क्षणी दौरा रद्द झाल्याने हिरमोड झाला, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी या दौऱ्यामुळे राजकीय शक्तीप्रदर्शनाची तयारीही केली होती, मात्र दौरा रद्द झाल्यामुळे सगळं फसलं. यावर्षीचा दौरा रद्द झाल्याने शहरातील गणेश मंडळांचा उत्साह कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button