ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू ! बारामतीजवळ झाला भीषण विमान अपघात; एकूण ६ जण ठार

Spread the love

बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button