ताज्या घडामोडीपिंपरी

अहिर सुवर्णकार समाजात ‘सुवर्ण पिंपळ संगीत मंचा’चा सुरेल ठेका

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अहिर सुवर्णकार समाजातील गायकांना समाजाचे हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या “सुवर्ण पिंपळ” समूहाच्या “सुवर्ण पिंपळ संगीत मंचा”ला समाजाच्या वार्षिक तिळगुळ समारंभात गाण्याची संधी देण्यात आली. दि. २४ व २६ जानेवारी रोजी भरलेल्या सोनार वाड्यात पार पडलेल्या या सुरेल मैफिलीला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मीनाक्षी  दुसाने व  मिलिंद दुसाने यांच्या सुंदर निवेदनाने आणि श्री गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या गाण्यापासून ते “संदेसे आते है” या गाण्यापर्यंत प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना भरभरून दाद दिली. तरुण व ज्येष्ठ गायकांच्या सादरीकरणामुळे समारंभाचा आनंद द्विगुणित झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. जगदीश विसपुते यांनी केले. अध्यक्षीय भाषण समाजाचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी केले, तर आभार श्री. बापूसाहेब पिंगळे यांनी मानले. स्वादिष्ट स्नेहभोजनानंतर समाज बांधव समाधानाने घरी परतले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष नंदकुमार वडनेरे,  देवेंद्र घोडनदीकर,  राजन वाघ, पराग वत्तुरकर,  प्रशांत सौंदनकर,  गोपाळ आगरकर,  राजेंद्र विभांडिक, अ‍ॅड. जगदीश विसपुते व गायक सुभाष चव्हाण यांनी संयोजन केले.

भविष्यातही समाजाच्या सहभागातून असेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील, असे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button