ताज्या घडामोडीपिंपरी
“अहिल्यादेवींचा अपमान प्रकरणी पोलिस आयुक्तालयात निवेदन; समाजबांधव आक्रमक”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान करणाऱ्या माथेफिरूला त्वरीत अटक करा अशी मागणी पिंपरी चिंचवड धनगर समाजाने पोलीस आयुक्तालायाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल फेसबुक या सोशल मिडिया माध्यमावर अत्यंत घाणेरड्या प्रकारचे अपशब्द वापरून धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या आमच्या या परमपूज्य मातेचा अपमान करणाऱ्या सुनील गोपाळराव उभे या मुळशी येथील समाजकंटकाला शोधून त्वरीत अटक करावी. त्याच्यावर गंभीरातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला कडक शिक्षा करावी. अशी विनंती आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने आपणास या निवेदनाद्वारे करीत आहोत. या गंभीर प्रकरणाची आपण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता दखल घ्यावी
निवेदन पिंपरी चिंचवड कमिशनर ऑफिसमध्ये जॉईंट कमिशनर सारंग आव्हाड तसेच डीवायएसपी डॉक्टर शिवाजी पवार यांना पिंपरी चिंचवड शहरातील सकल धनगर समाज बांधवांकडून देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्यासह विणा सोनवलकर, सूर्यकांत गोफने, मनोज मारकड, अजय दूधभाते, महावीर काळे, गणेश खरात, आशा काळे, पोपट हजारे, महादेव कवितके, युवराज दाखले, सुनील बनसोडे, नवनाथ भिडे, बिरू व्हन, रवी दांडगे, निखिल पडळकर, भारत मदने, लक्ष्मण शिंदे, नामदेव मारकड, सुरज घोडके, बंडूशेठ मारकड, भटू धनगर, चंद्रकांत जानकर, नाना गावडे, पल्लवीताई मारकड, परमेश्वर बोरले, विवेक डोने, अभंग देवकाते, नवनाथ बोरले, संजय यमगीर, मोहन बुरले, रुपेश गायकवाड, दीपक रोडे, संजय खंडगावे, माऊली कोपनर, प्रशांत शिरसाट, वैभव लंबाते, सतीश भवाळ, सुरज कांबळे, देवा यमगीर, योगेश सोनवणे, सुरेश नाईक, शिवशंकर हाके, राम माने, महादेव हाके, मच्छिंद्र चिंचोळे, भरत महानवर, दीपक भोजने, अक्षय बोडके, आशिष खंडेलवाल, संजय कांबळे, विष्णू पवार, रघु मालिशे, श्रीकांत मालिशे, रामेश्वर बिरादार, बच्चन शर्मा, गोकुळ हसे, अण्णा खोबरे, सरफराज भाई इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्व कार्यकर्त्यांना जॉईंट सीपी सारंग आव्हाड यांनी ताबडतोब सुनील उभे नावाच्या या गुन्हेगारावर कारवाई करण्यात येईल असा शब्द आम्हा सगळ्यांना दिला. त्याच्यावर ताबडतोब गुन्हा नोंद करण्याचा आदेश त्यांनी आमच्या समोर संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार चिंचवड पोलीस स्टेशन या ठिकाणी सदर आरोपीवर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या तत्परतेसाठी आम्ही सर्वांनी जॉईंट सीपी सारंग आव्हाड तसेच डीवायएसपी शिवाजी पवार या दोघांचेही आभार मानले.














