ताज्या घडामोडीपिंपरी

 “ॲड.सुहास पडवळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) लिगल सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार लिगल सेल महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदी    ॲड.  सुहास पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्र पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

ॲड. सुहास पडवळ हे मागील २९ वर्षांपासून पिंपरी व पुणे न्यायालयात वकिली व्यवसाय करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लिगल सेलच्या पातळीवर विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. पिंपरी-चिंचवड लिगल सेल शहराध्यक्षपदी काम करताना त्यांनी पक्ष संघटनाला सातत्याने बळकटी दिली आहे.

पडवळ यांनी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी तज्ञ संचालक, महाराष्ट्र–गोवा वकिल परिषदेच्या शिस्तपालन समितीचे सदस्य तसेच पुणे जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना    ॲड. पडवळ म्हणाले की, “समाजातील सर्व घटक आणि वकिल बांधवांना सोबत घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांची विचारधारा सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलमध्ये त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनाला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button