चिखली पोलीस ठाण्यात नव्या फौजदारी कायद्यांवरील अभ्यासपूर्ण कार्यशाळा संपन्न
अॅड. मंगेश खराबे यांचे BNS, BNSS आणि BSA कायद्यांवरील मुद्देसूद व सखोल मार्गदर्शन

चिखली पोलीस स्टेशन मधील सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी
चिखली,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –भारताच्या दंडविधानात क्रांतिकारी परिवर्तन घडवणाऱ्या भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) या तीन नव्या कायद्यांवर आधारित एक अभ्यासपूर्ण कायदेविषयक कार्यशाळा आज चिखली पोलीस ठाण्यात पार पडली.
या कार्यशाळेचे आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. साळुंखे साहेब यांच्या विशेष पुढाकाराने सूचनेनुसार करण्यात आले होते. कायद्याचे सखोल आणि व्यावसायिक विश्लेषण करण्यासाठी विधीज्ञ, अॅड. मंगेश खराबे यांना विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कायद्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन – अॅड. मंगेश खराबे यांचे मार्गदर्शन
अॅड. मंगेश खराबे यांनी सत्रामध्ये BNS, BNSS आणि BSA या तीन कायद्यांमध्ये काय मूलभूत बदल झाले आहेत, त्याचे पोलीस अधिकाऱ्यांवर काय परिणाम होतील, त्यात कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, हे अत्यंत समर्पक उदाहरणांसह समजावले.
त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे खालीलप्रमाणे –
भारतीय न्याय संहिता (BNS)
●IPC च्या 1860 पासूनच्या कायद्याच्या तुलनेत अनेक गुन्ह्यांचे पुनर्रचनात्मक वर्गीकरण
●मोबाईल, सायबर गुन्हे यांच्यासाठी स्वतंत्र तरतुदी
●स्त्री आणि बालकांवरील अत्याचारांसाठी कडक शिक्षा
●पळवाटांना आळा घालणाऱ्या तरतुदींची स्पष्टता
*भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS)
●CRPCच्या पारंपरिक प्रक्रियेत आमूलाग्र बदल
●Zero FIR, e-FIR, डिजिटल अटक प्रक्रिया
●चौकशी आणि तपास अधिक प्रभावी बनवणाऱ्या तरतुदी
●अटक व जामिनासाठी स्पष्ट निकष व प्रक्रिया
*भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA)
●1872 मधील Evidence Act ची आधुनिक रूपांतरण
●इलेक्ट्रॉनिक व डिजिटल साक्ष्यांना कायदेशीर मान्यता
●मोबाईल, CCTV, मेल्स व टेक्स्ट मेसेजेसला साक्ष्य म्हणून स्वीकार
●साक्षीदार संरक्षणाची नवीन तरतूद
*वरीष्ठ पोलीस अधिकारी वर्गाचा उत्तम प्रतिसाद*
या कार्यशाळेला चिखली पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
PSI अश्विनी ताले, लोहकरे मॅडम, तसेच अनेक पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला अधिकारी आदींसह ५० हून अधिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत प्रश्नोत्तराचे सत्र अत्यंत माहितीपूर्ण ठरले. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कारभारातील अडचणी, शंका व गुंतागुंतीच्या प्रक्रियांबाबत प्रश्न विचारले, जे अॅड.मंगेश खराबे यांनी विश्लेषणात्मक व सहज भाषेत स्पष्ट केले.
चिखली पोलीस ठाण्याचा पुढाकार – कायदेशीर सक्षमीकरणाची दिशा
वरिष्ठ निरीक्षक साळुंखे साहेब यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा उद्देश पोलीस अधिकाऱ्यांना नव्या कायद्यांची व्यावहारिक समज देणे, अंमलबजावणीतील अडथळ्यांना ओळखणे, आणि बदलत्या कायदेशीर युगात तंत्रस्नेही, नागरिककेंद्रित पोलीस प्रशासन घडवणे हा होता.
सत्राच्या अखेरीस अधिकारी वर्गाने अॅड. मंगेश खराबे यांचे मनापासून आभार मानले आणि भविष्यात अधिक सखोल प्रशिक्षणासाठी अशाच कार्यशाळांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.








