ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

महाराष्ट्र खड्डे मुक्त व्हावा… सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं गणरायाकडे साकडं

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या निगडी प्राधिकरण येथील घरी गणपती बाप्पांचा आगमन झालंय पर्यावरण पूरक असलेली ही मूर्ती सोनाली स्वतः बनवते. यावर्षी निसर्गाचा रूप आणि समतोल साकारण्याचा प्रयत्न सोनालीनं केलाय. संपूर्ण महाराष्ट्र खड्डे मुक्त व्हावा यासाठी बापाकडे तिनं साकडं घातलंय.

आज माध्यमांशी बोलताना सोनाली कुलकर्णीनं सांगितलं की, यंदा हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचे मुख प्रकट होतंय अशा पद्धतीनं मूर्तीची रचना केलेली आहे. त्याचं कारण असे की,अशाच पद्धतीच एक चित्र आम्ही पाहिलं होतं, जर हे चित्र सुंदर दिसत असेल तर याचे मूर्ती देखील खूप सुंदर होईल हा विचार करून भाऊ अतुल कुलकर्णी यांच्यासह मूर्तीची रचना करण्यात आलेली आहे. हत्तीच्या रूपात श्रींची मूर्ती असल्याकारणानं आम्ही डेकोरेशन सुद्धा जंगल आणि निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं इको फ्रेंडली विचार करून या वेळी खूप चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन तयार करण्याचा प्रयत्न आहे. या गणपतीच्या डेकोरेशनसाठी मनीप्लांटच्या खरोखरच्या वेलींचा वापर केला आहे.श्रींच्या मूर्ती मागे एका कापडावर कॅलिग्राफी करून गणपती बाप्पाचे चित्र रेखाटले आहे तर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी या कापडावर विणकाम करून या डेकोरेशनसाठी मदत केलेली आहे. कुठेतरी सामाजिक उपक्रम असावा या अनुषंगानं आज श्रींच्या मूर्तीची रचना करण्याचा प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीनं पर्यावरण पूरक आणि सामाजिक भावनांचा समतोल जपून आमच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत.

रस्त्यावर वाहतूक होणाऱ्या दुचाकी चार चाकी प्रवाशांसाठी खड्डे मुक्त महाराष्ट्र होऊ दे असे साकडं सोनाली कुलकर्णीने श्री चरणी घातले आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आमचे खूप चांगले आणि ऐतिहासिक चित्रपट सादर होणार आहेत. नुकतेच चित्रीकरण पूर्ण झालेले आहेत परंतु काहीतरी विघ्नामुळे हे चित्रपट अडकलेले आहेत छत्रपती तारारानी आणि रावसाहेब हे दोन चित्रपट चित्रीकरण होऊन पूर्ण तयार आहेत लवकरच विघ्न दूर होऊन हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील. लवकर त्या ही चित्रपटाचे विघ्न दूर व्हावे अशी बाप्पा चरणी प्रार्थना करते. असे प्रतिपादन सोनाली कुलकर्णी यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button