ताज्या घडामोडीपिंपरी
अभिराज फाउंडेशनमध्ये राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन साजरा

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अभिराज फाउंडेशन वाकड या दिव्यांग मुलांच्या शाळेत मध्ये जागतिक मतिमंद दिन साजरा करण्यात आला.
पूर्वी मतिमंद हा शब्द वापरला जात होता पण आता ‘दिव्यांग’ असे शब्द वापरले जातात कारण ते अधिक सन्माननीय आहे व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार आता यांना बौद्धिक अक्षम (Intellectual disability )असे संबोधले जाते. या दिनाचे औचित्य साधून आज मुलांचे मनोरंजन खेळ घेण्यात आले तसेच करमणुकीचे व गाण्याचे कार्यक्रम घेतले त्यामध्ये मुलांनी खूप आनंद घेतला. तसेच शाळेतील शिक्षिका सौ वंजारी यांनी मुलांना टिफिन बॅक गिफ्ट दिल्या अशाप्रकारे आज अभिराज संस्थेमध्ये जागतिक मतिमंद ( बौद्धिक अक्षम ) पुनर्वसन दिन साजरा करण्यात आला.



















