चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

अवघ्या 71 व्या वर्षी पूर्ण केला ‘नाट्य अभिनय अभ्यासक्रम’ 

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शालेय व महाविद्यालयीन जीवनात 45 वर्षांपूर्वी तीन चौक तेरा, लग्ना आधी वरात, अपराध मीच केला, सूर्याची पिल्ले अशा जवळपास 12 नाटकात अभिनय केला आणि त्यानंतर प्रत्यक्ष जीवनाचे नाट्य सुरू झाल्यामुळे नाटक करण्याला संधीच मिळाली नाही. पण एक दिवस पैस रंगमंच अर्थात थिएटर वर्कशॉप कंपनी चे संचालक प्रभाकर पवार यांची सहज भेट झाली. या भेटीत ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचा एक वर्षाचा नाट्य अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवितात असे समजले. वय वर्ष अवघे 71 असूनही प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे भूतपूर्व कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी एक वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली. आणि वर्षभरात हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

प्रशिक्षणादरम्यान ‘पुनरुत्थान’ या नाटकात त्यांनी ‘राजा पौरुमिळ’ यांची तर परीक्षेच्या सादरीकराणात ‘उदवस्त धर्मशाळा’ या नाटकातील प्राध्यापक कुलकर्णी यांची भूमिका वठवली. पुण्यातील फिल्म व टेलिव्हिजन इंडियन इन्स्टिट्यूट ( एफ.टी.आय.आय) चे माजी विभागप्रमुख श्री समर नखाते आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नातक रेणू गर्ग यांच्या हस्ते त्यांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्या बरोबर रोहन बोरगावकर, राज कदम,संगीता हळनोर आणि शुभम गोळे यांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली.

डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्याकडे अगोदरच असलेल्या स्नातकाच्या 13 पदव्या आणि अगणित प्रमाणपत्रांमध्ये आणखी एका प्रमाणपत्राची भर पडली एवढाच याचा अर्थ नसून हौसेला मोल नसतं तसं वय ही नसतं हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखविले, असे उद्गगार प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा यांनी त्यांचे अभिनंदन करताना काढले. तसेच प्रतिभा व्यवस्थापन महाविद्यालयांचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा महाविद्यालयांच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका वृंदा जोशी, तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले. व भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button