ताज्या घडामोडीपिंपरी
ॲड. सुप्रिया जालिंदर गायकवाड यांची आम आदमी पार्टी पिंपरी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टीच्या कार्यकर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि जनआंदोलनातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचा गौरव करत, सुप्रिया जालिंदर गायकवाड यांची आम आदमी पार्टी पिंपरी विधानसभा अध्यक्ष म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श रवीराज बाबन काळे यांनी सुप्रिया गायकवाड यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले. त्यांच्या समाजकार्यातील सक्रिय सहभाग, महिलांच्या प्रश्नांबाबतचे संवेदनशील नेतृत्व आणि जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे पिंपरी विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे संघटन अधिक मजबूत होऊन पक्षाचे धोरण आणि दिल्ली-पंजाबमधील जनकल्याणकारी मॉडेल जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वेगाने होईल, असा विश्वास शहराध्यक्ष रविराज काळे यांनी व्यक्त केला.
सुप्रिया गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत पिंपरी विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे ध्येय आणि तत्त्वे घराघरात पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी उपस्थित शहराध्यक्ष रविराज काळे, सुरेश गायकवाड, राहुल मदने, विकी पसोटे, सुरेश भिसे, इम्रान खान, शिवकुमार बनसोडे, संजीव झोपे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.













