ताज्या घडामोडीपिंपरी

मतदार यादीच्या शुल्क धोरणात सुधारणा करण्याची ‘ आम आदमी पार्टीची मागणी’

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष श्री. रविराज बबन काळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीच्या शुल्क धोरणात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
काळे यांनी दाखवून दिले की, सध्या आकारले जाणारे शुल्क अनावश्यकरीत्या वाढीव असून सर्वसामान्य उमेदवार आणि नागरिकांसाठी आर्थिक अडथळे निर्माण करणारी आहे.
मुख्य आक्षेप
 शुल्क धोरणातील तफावत व नागरिकांवरील वाढता आर्थिक बोजा
प्रती पान ₹ 2 शुल्क; एका वार्डाची मतदार यादी घेताना एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.
उमेदवारी अर्जासाठी सुमारे ₹10,000 खर्च, त्यात अतिरिक्त मतदार यादीचे शुल्क सामान्य व्यक्तीसाठी परवडणारे नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यादी घेतल्यास खर्च तब्बल ₹2.5 लाखांपर्यंत.
ऑनलाइन उपलब्ध यादीमध्ये मतदारांचे फोटो नसल्यामुळे पडताळणी अपूर्ण व त्रुटीपूर्ण ठरते.
फोटोसह यादी सुलभ उपलब्ध नसणे पुनरावृत्ती, चुकीची नावे किंवा शंकास्पद नोंदी शोधणे कठीण होत आहे.
काळे यांनी स्पष्ट केले की, मतदार यादी हे सार्वजनिक कागदपत्र असून त्याची उपलब्धता सहज, कमी दरात आणि सर्वसमावेशक असणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. अवाजवी शुल्क पारदर्शकतेची गळचेपी करते आणि सामान्य नागरिकांचा सहभाग कमी करते.
‘आप’ची राज्य निवडणूक आयोगाकडे स्पष्ट मागणी
मतदार यादीच्या शुल्क धोरणात तातडीने पुनर्विचार करावा
शुल्क तर्कसंगत, सुलभ आणि सर्वांना परवडणारे करावे
फोटोसहित मतदार यादी सर्व उमेदवारांना उपलब्ध करून पारदर्शकता वाढवावी
शुल्क धोरण जनसहभाग वाढवणारे आणि सर्वसमावेशक असावे.
रविराज काळे यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, निवडणुकीत पारदर्शकता आणि जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी शुल्क धोरणातील बदल अत्यावश्यक आहेत. हे परिवर्तन म्हणजे लोकशाही बळकट करण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल असेल अशी तक्रार ईमेलद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button