महर्षि आनंद सेवा भक्ति प्रतिष्ठान चे २०२५ चे महर्षि आनंद सेवा पुरस्कार जाहीर
जैंनम जैन , जिविका जैन,निर्मलाजी छाजेड़ पुरस्काराचे मानकरी

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आनंद शिष्य रत्न प्रवचन भास्कर प पू प्रशांतऋषिजी म सा यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या महर्षि आनंद सेवा भक्ति प्रतिष्ठान चे ह्या वर्षिच्या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी नुकतीच दापोडी जैन स्थानकामध्ये धर्मसभेमध्ये केली.
दुबई येथील नवयुवक जैनम जैन याला जैन युवा प्रेरणा – महर्षि आनंद सेवा पुरस्कार, जिविका जैन हिला जैन आगम अध्यात्मिक – महर्षि आनंद सेवा पुरस्कार आणि निर्मलाताई चंद्रकांत जी छाजेड़ यांना समाजसेवा क्षेत्रातील- महर्षि आनंद सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी दिली. सदर पुरस्कार प पू प्रशांतऋषिजी म सा आणि प पू विजयस्मिताजी म सा यांच्या दीक्षादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दि २ नोव्हेंबर रविवार रोजी संस्थेच्या पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. दापोडी श्री संघाचे कार्याध्यक्ष दिलीप भन्साळी , तसेच इतर संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, राजेंद्र कर्नावट, अशोक पगारिया,रमणलाल शिंगवी, रविन्द्र बलाई आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




















