ताज्या घडामोडीपिंपरी

आम आदमी पार्टी कडून शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज पिंपळे निलख येथील मुख्य बसस्थानक येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  अजित फाटके पाटील (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी महाराष्ट्र) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमामध्ये रविराज काळे यांनी कै. नारायण शंकर घोडके यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलांकरिता महात्मा जोतिबा फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), मुक्ताबाई रामचंद्र बालवडकर यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलींसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), आणि पिंपरी चिंचवड शहरातील १०वी व १२वी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आम आदमी पार्टी विशेष स्कॉलरशिप (११,०००/- रु.) या शिष्यवृत्ती जाहीर केल्या.

यावेळी श्री. अजित फाटके पाटील यांनी बोलताना शहराध्यक्ष श्री. रविराज काळे व आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड यांचे विशेष कौतुक केले. रविराज काळे यांनी पिंपळे निलख परिसरात केलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे परिसराचा कायापालट झाला असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे अश्या शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले. ज्या ज्या अंगणवाडी व शाळांमध्ये रविराज काळे यांनी उपक्रम राबवले त्या त्या शाळांतील शिक्षक-शिक्षिकांनी मनोगत व्यक्त करत आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल टाकत, आम आदमी पार्टीने गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य प्रदान करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध क्षेत्रात उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन *शहराध्यक्ष श्री. रविराज बबन काळे* यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमास पक्षाचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, यल्लाप्पा वालदोर, पुणे शहर युवक शहराध्यक्ष अमित मस्के, दत्तात्रेय काळजे, चंद्रमणी जावळे, सुनील शिवशरण, शुभम यादव, अजय सिंग इत्यादी पदाधिकारी,पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button