ताज्या घडामोडीपिंपरी
आम आदमी पार्टी प्रचार प्रमुखपदी सुरेश गायकवाड यांची नियुक्ती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समितीच्या वतीने संघटनात्मक बांधणी व निवडणूक प्रचार अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री. रविराज बबन काळे यांच्या नेतृत्वाखाली मा. सुरेश अनंता गायकवाड यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष संघटनेतील त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि कार्यशैली लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे आगामी निवडणुकीत पक्षाचा प्रचार अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख पद्धतीने राबवला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. श्री.सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकजुटीने काम करतील व आम आदमी पार्टीला पिंपरी चिंचवड शहरामध्ये भक्कम यश मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने मा. श्री. सुरेश अनंता गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.




















