ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजकीय व्यासपीठावर मोठ्या बदलांची नोंद घेत असताना, आम आदमी पार्टीने पिंपरी-चिंचवड महानगरासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करत नेतृत्वाच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी  प्रकाश जरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या नव्या कार्यकारिणीत शहराच्या राजकारणात अनुभव असलेल्या तसेच कार्यक्षमतेने सिद्ध झालेल्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाचे संघटन बळकट करणे, आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखणे आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे, या हेतूने ही नियुक्ती केली गेली आहे.

पक्षाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, या नियुक्त्या कार्यकर्त्यांमधील जोश वाढवण्यासोबतच, स्थानिक पातळीवर पक्षाची छबी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. नव्या कार्यकारिणीवर पक्षश्रेष्ठींनी विश्वास व्यक्त केला असून, स्थानिक समस्यांवर प्रभावीपणे काम करण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

या नेत्यांची निवड त्यांच्या सामाजिक भान, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क क्षमतेच्या आधारे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्वच पदाधिकाऱ्यांना शहराच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वरिष्ठ उपाध्यक्ष – वैजनाथ शिरसाठ
उपाध्यक्ष – डॉ.अनिल राॅय
उपाध्यक्ष -प्रकाश हगवणे
उपाध्यक्ष – चंद्रमणी जावळे
उपाध्यक्ष – अशोक लांडगे
उपाध्यक्ष – ब्रम्हानंद जाधव
उपाध्यक्ष – दत्तात्रय काळजे
उपाध्यक्ष – संदीप देवरे
महासचिव – सचिन पवार
मुख्य प्रवक्ता – सुरेश गायकवाड
सचिव – इम्रान खान
सचिव – स्वप्निल जेवळे
सहसचिव – संजिव झोपे
संघटनमंत्री – मंगेश आंबेकर
संघटनमंत्री – कमलेश रणवरे
संघटनमंत्री – यल्लापा वालदोर
संघटनमंत्री – गोविंद माळी
संघटनमंत्री – सचिन थोरात
संघटनमंत्री – सिता केंद्रे
संघटनमंत्री – पुजा सिंग
संघटनमंत्री – सुनिल शिवशरण
संघटनमंत्री – राज चाकणे
सह संघटनमंत्री – अजय सिंग
सह संघटनमंत्री – सुरेश भिसे
सह संघटनमंत्री – मोतीराम अगरवाल
सह संघटनमंत्री – नंदु नारंग
महिला आघाडी उपाध्यक्ष – सरोज कदम
ओ बी सी आघाडी – राहुल मदने

डाॅक्टर आघाडी – डॉ.योगेश बाफना
व्यापारी आघाडी – प्रमोद लाड
बचतगट आघाडी – भारती जाधव
पर्यावरण आघाडी – कौस्तुभ सलवार
मिडीया आघाडी – यशवंत कांबळे
युवा आघाडी – सुखदेव कारळे
पदवीधर आघाडी – कुणाल वक्टे
विद्यार्थी आघाडी – अभिजित कदम
कामगार आघाडी – शुभम यादव
IT सेल आघाडी – ज्योती शिंदे
उद्योग आघाडी – सुरेश बावणकर
सदस्य – दमयंती नेरकर
सदस्य – सिमा बावणकर
सदस्य – योगेश गायकवाड

ही नियुक्ती पुढील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.  शहराध्यक्ष रविराज काळे, प्रभारी प्रकाश जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील,  प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे,  प्रदेश संयोजन मंत्री सागर पाटील.

पक्षाच्या वतीने सर्व नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, या माध्यमातून शहराच्या राजकारणात आम आदमी पक्ष अधिक सक्रीय भूमिकेत दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button